Maratha Reservation: ‘साहेब याचे परिणाम बघा कसे भोगायला लागतील..’, जरांगे-पाटलांचा कोणाला थेट इशारा?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

maratha reservation anterwali sarathi shinde fadnavis you will have to suffer consequences of this manoj jarange patil direct warning
maratha reservation anterwali sarathi shinde fadnavis you will have to suffer consequences of this manoj jarange patil direct warning
social share
google news

Maratha Reservation on Manoj Jarange: अतंरवाली सराटी: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा हा सातत्याने चिघळत चालला आहे. त्यातच अतंरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) उपोषणाचं हत्यार उपसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) हे देखील आपल्या मागणीवर ठाम आहेत. मागील सात दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी त्यांनी पाणी घेणंही बंद केलं आहे. याचवेळी आता त्यांनी सरकारला इशाराही दिला आहे की, या सगळ्याचे परिणाम त्यांना भोगायला लागणार आहेत. (shinde fadnavis you will have to suffer consequences of this manoj jarange patil direct warning to whom)

मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा सरकारला सांगितलं की, त्यांना चर्चा करायची असेल तर त्यांनी इथे येऊन चर्चा करावी. तसेच त्यांना वेळ किती आणि कशासाठी पाहिजे? हे देखील सांगावं असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. आता जरांगे पाटलांच्या या आवाहनानंतर सरकार जरांगे पाटलांशी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन चर्चा करणार का याकडेच सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत.

हे ही वाचा >> Maratha Reservation: शहाजी बापूंची गाडी अडवली, आमदार साहेब खाली उतरले, कानात कुजबुजले अन्…

मनोज जरांगेचा सरकारला थेट इशारा..

‘मी न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही.. आजपासून मी पाणी घेणं बंद केलं आहे. सगळे पुरावे आहेत तरीही ते मराठ्यांना आरक्षण देत नाही. काही जाती अशा आहेत की, त्यांना पुरावे नसताना आरक्षण दिलं आहे. आम्हाला आता कठोर लढावं लागेल. होणाऱ्या सगळ्या परिणामांची जबाबदारी यापुढे सरकारची राहणार आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘सरकार जाणूनबुजून गुन्हे दाखल करत आहेत आपल्यावर. प्रत्येकाने आपल्या बांधवाच्या मदतीला ताबडतोब जायला हवं. प्रशासन जाणूनबुजून सरकारचं ऐकून छळ करतंय मराठा समाजाचं. म्हणून कोर्टामार्फत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे.’ असं विधान जरांगे पाटलांनी यावेळी केलं आहे.

हे ही वाचा >> Manoj Jarange: ‘असले बाजारचाळे करू नका…’, जरांगे-पाटील संतापले; कोणावर उठवली टीकेची झोड?

‘परंतु सरकारला शहाणपणाची भूमिका सांगतो. शहाणे असाल तर विनाकारण मराठ्यांवर गुन्हे दाखल करू नका. ते मागे घ्या. कारण गुन्हे दाखल झाल्याने समाज जास्त रोष व्यक्त करायला लागला आहे. इकडं माणसं मरायला लागली आहेत तरी तुम्ही तिकडे कसल्या बैठका घेता? रोज एक बैठक.. एकदाच काय ती बैठक घ्या.. याचे परिमाण खूप वाईट होणार आहेत. शिंदे साहेब, फडणवीस साहेब.. पवार साहेब याचे परिणाम वाईट होणार आहे. याचे परिणाम बघा कसे भोगायला लागतील तुम्हाला.. मी तर पाणी आजपासून सोडलं आहे.’

‘सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे? सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे सांगाव. सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली? त्याचा तपशील जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही . तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे, का पाहिजे? तुम्ही मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे सांगा.’

ADVERTISEMENT

‘तुमच्या मनात काय आहे हे कळू दे. मराठा समाज दगाफटका करणारा नाही. आमच्याकडून खोट-नाटं वधवून घेऊ नका. जर त्यांना वेळ हवा असेल तर त्यांनी इथं यावं, का आणि कशासाठी वेळ हवा ते सांगावं मग आम्ही ठरवू द्यायचा की नाही.’ असं म्हणत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT