"...मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही?", आव्हाडांचं अजित पवारांच्या वर्मावर बोट

रोहिणी ठोंबरे

Jitendra Awahd Ajit Pawar Maharashtra Lok Sabha election : महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही, माज कसला दाखवता?- जितेंद्र आव्हाड 

point

'संपवून टाका, कुठल्याच निवडणुकीत जागा देऊ नका', अजित पवारांसह शिंदेवर टीकास्त्र 

point

'भाजपाला संविधानच मान्य नाही' 

Jitendra Awahd Ajit Pawar Maharashtra Lok Sabha election : लोकसभा निवडणुक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या रणधुमाळीत महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यातील 24 मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. उद्या (13 मे) चौथ्या टप्पातील मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत उरलेल्या 24 मतदारसंघात प्रचाराल वेग आला आहे. राजकीय वर्तुळात पक्षावरील टीका, एकमेकांना पाडण्याची भाषा अनेकदा केली जाते. नुकतेच अजित पवारही प्रत्येक विरोधी उमेदवाराला पाडू असं म्हणाले. यावरून आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली. (lok sabha slection 2024 jitendra awhad criticizes ajit pawar in thane rajan vichare campaign rally)

मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही, माज कसला दाखवता?- जितेंद्र आव्हाड 

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “आम्ही मेलो तरी, रक्ताचे पाट वाहिले तरीही या देशाचे संविधान बदलू देणार नाही, या देशाची लोकशाही बदलू देणार नाही. ठाण्यात ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दारी आहे. माझी निष्ठा तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल. मी एकटाच तलवार घेऊन लढत असतो. मजा येते लढायला आणि समोर दिग्गज अजिदादांसारखा असले तर अजून लढायला आवडतं.

हेही वाचा: Lok Sabha Election BJP : 'अबकी बार 400 पार' भाजपवरचं झालं बुमरँग!

ते आता ढोस देत सुटलेत. तुला पाडेन, तुला पाडेन. मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही. लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता?” असा सवाल करत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp