अंधश्रद्धेतून बाळावर अघोरी उपाय, आईने चिमुकल्याचा हातच गरम तेलात टाकला

मुंबई तक

ADVERTISEMENT

mother burnt fingers of 5 day old baby boy putting hot oil uttarpradesha barabanki
mother burnt fingers of 5 day old baby boy putting hot oil uttarpradesha barabanki
social share
google news

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बाराबंकीमध्ये एका आईने आपल्याच 5 दिवसांच्या बाळाची (Baby Boy) बोट गरम उकळत्या तेलात टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेतून आईने हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती आहे. चिमुकल्याच्या जन्मानंतर ना तो रडत होता, ना दुध पित होता. त्यामुळे भूतबाधा झाल्याच्या संशयातून महिलेने हे धक्कादायक पाऊल उचललं होते. दरम्यान या घटनेत नवजात बालकाच्या हाताची बोट खुपच भाजली आहेत. त्याला आता उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इतकं करून सुद्धा महिलेला तिच्या कृत्यावर पश्चाताप नाही आहे. (mother burnt fingers of 5 day old baby boy putting hot oil uttarpradesha barabanki)

ADVERTISEMENT

चिमुकल्याची आई ही सरोली गावची रहिवाशी आहे. तिने काही दिवसांपुर्वीच एका 5 दिवसाच्या चिमुकल्याला जन्म दिला होता. पण चिमुकल्याच्या जन्मानंतर ना तो रडत होता, ना तो दुध पित होता. या घटनेवर आईला भुतबाधा झाल्याचा संशय होता. या संशयातूनच आईने चिमुकल्याची बोट गरम उकळत्या तेलात टाकून त्याला अघोऱी शिक्षा दिली होती.

हे ही वाचा : Mira Road: ‘मी नपुंसक आहे, आणि…’, सरस्वती वैद्यची हत्या करणारा मनोज साने असं का म्हणाला?

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तिने एका मुलाला जन्म दिला होता. या जन्मानंतर चिमुकला ना रडला होता, ना त्याने दुध पिले होते. त्यामुळे आई घाबरून गेली होती. कारण याआधी तिने दोन मुलांना जन्म दिला होता. या दोनही मुलांचा याच कारणामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आईला मुलावर भूतप्रेत झाल्याचा संशय होता. याच संशयातून तिने चिमुकल्याची बोट गरम उकळत्या तेलात टाकून त्याला अघोऱी शिक्षा दिली होती.अंधश्रद्धेतून महिलेने चिमुकल्यासोबत हे कृत्य केले होते.

हे वाचलं का?

चिमुकल्याची बोट जळाल्यापासून तो रडतो आहे आणि दुध देखील पित आहे, असे महिलेने आता सांगितले आहे. खर तर मुलावरील भूताची सावली दुर करण्यासाठी तिने हे कृत्य केले आहे. या कृत्यानंतर चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेत चिमुकल्याची बोट पुर्णत भाजली आहेत. त्याचसोबत त्याला खूप ताप देखील आला आहे. त्याची तब्यते सध्या नाजूक असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे महिलेला या गोष्टीचा अजिबात पश्चाताप झालेला नाही आहे. कारण तिचा मुलगा आता रडतो ही आहे आणि दुध देखील पितो आहे. चिमुकल्याला आता ताप आहे, हा ताप उतरल्यावर त्याची तब्येत ठिक होणार आहे, असे डॉक्टरने सांगितले आहे. दरम्यान या घटनेवर वडिलांचे म्हणणे आहे की, चिमुकल्याची जेव्हा बोट जळाली, तेव्हा ते घरी नव्हते.

हे ही वाचा :  Anjali Murder Case : मंदिर, आई आणि मर्डर… अल्पवयीन मुलीनेच रचला भयंकर कट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT