Mumbai Crime: 17 दिवसांचं बाळ अन्…अंगावर काटा आणणारी कहाणी
A shocking incident has come to light from Navi Mumbai’s Mankhurd. In this incident, a woman sold her 17-day-old baby for two and a half lakhs. नवी मुंबईच्या मानखुर्दमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेने आपल्याच पोटी जन्मलेल्या 17 दिवसाच्या बाळाची अडीच लाखाला विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT
नवी मुंबईच्या (Navi Mumbai) मानखुर्दमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेने आपल्याच पोटी जन्मलेल्या 17 दिवसाच्या बाळाची अडीच लाखाला विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला एका मध्यस्थींच्या मार्फत खरेदीदारांच्या संपर्कात आली होती. त्यानु्सार अडीच लाखात बाळाची विक्री करण्याचा ठरलं होते.ठरल्याप्रमाणे महिलेने बाळाची विक्री केली आणि अडीच लाख देखील घेतले. पण अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्य़ा पक्षाने हा डाव उधळून लावत आईसह बाळाची विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक केली. या कारवाईने आरोपींचा मानवी तस्करीचा डाव फसला होता. (mother sold her baby two and half lakh rupees human trafficking police arrested gang navi mumbai crime)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीसनूसार, मानखुर्दमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय मुमताज रेहमान मंडळ या महिलेने काहीच दिवसांपूर्वी एका नवजात बालकाला जन्म दिला होता. या जन्मानंतर महिलेने त्या बाळाची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार मुमताज ही एका टोळीच्या संपर्कात आली होती. या टोळीतील महिला मध्यंस्थी करून मुमताज हिचे बाळ विकणार होती. त्यानुसार टोळीने ग्राहक शोधायला सुरुवात केली होती.
हे ही वाचा : Crime: तुरुंगात मैत्री, बाहेर येताच मित्राच्या पत्नीसोबतच… ‘त्या’ कृत्याने मैत्रिला फासला काळिमा
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आधीच या टोळीच्या मागावर होता. त्यामुळे त्यांना य़ा घटनेची टीप लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणात डमी ग्राहक पाठवून आरोपींनी रंगेहाथ पकडण्याचा प्लान रचला होता. ठरल्यानुसार बाळ विक्रीसाठी मुमताजशी संपर्क साधणाऱ्या मध्यस्थीच्या मोबाईल फोनवर डमी ग्राहक बनवून व्हाट्सअॅप मेसेज करण्यात आला.
हे वाचलं का?
मध्यस्थीने देखील या मेसेजवर रिप्लाय करून बाळ विकण्याची तयारी दर्शवली आणि अडीच लाखात बाळाची विक्री करण्याचं पक्क झालं. त्यानंतर डमी ग्राहकांच्या माध्यमातून पथकाने आईला आणि मध्यस्थी करणाऱ्या टोळीला खारघर येथे बोलावून घेतले. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर व त्यांच्या पथकाने शनिवारी दुपारी खारघर सेक्टर 21 मधील सिद्धी विनय बिल्डींगजवळ सापळा रचला होता.
बाळाच्या खरेदीच्या ठिकाण ठरल्यानंतर मध्यस्थी करणारी महिला मुमताज खान, रिक्षा चालक नदीम अन्सारी व बाळाची आई मुमताज मंडळ हे तिघेही 17 दिवसांच्या बाळाला घेऊन रिक्षामधून खारघरमध्ये पोहोचले होते. त्यानंतर आई आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेची डमी ग्राहकासोबत भेट झाली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या महिलेने आईकडून बाळ घेत डमी ग्राहकाच्या हाती सुपूर्द केले. त्यानंतर डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे अडीच लाख मध्यस्थी करणाऱ्या महिलेच्या ताब्यात दिले. यानंतर सापळा रचून बसलेले पोलीस डमी ग्राहकाजवळ पोहोचले आणि त्यांनी तिघांना ताब्यात घेतले आणि मानवी तस्करीचा हा डाव उधळून लावला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime: जेवणात दररोज द्यायचा विष…, जावयाने सासूला का संपवलं?
पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करून आणखीण पाच जणांना अटक केली. अशा प्रकारे पोलिसांनी या प्रकरणात मुमताज रेहमान मंडळ (28), मुमताज अब्बास खान (48), नदिम अन्सारी (29), गुलाम अन्सारी (37), सुरेश काबंळे (60), जुबेदा रफिक (49), शमिरा शेख (42), दिलशाह आलम (42) अशा आठ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT