मुंबईत वासनेचा बाजार, हायप्रोफाईल सेक्स रॅकेट अन्..

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai crime andheri high profile sex racket exposed police rescue 9 girls from 5 states
mumbai crime andheri high profile sex racket exposed police rescue 9 girls from 5 states
social share
google news

Mumbai Sex Racket: दीपेश त्रिपाठी, मुंबई: अंधेरी परिसरातून एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 9 मुलींची सुटका केली आणि स्पा मॅनेजरला अटक केली. स्पाचा मालक फरार असल्याचे सांगण्यात येत असून, त्याला पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. या व्यवसायात अनेक बडे लोक सामील असल्याचा संशय पोलिसांना आहे. (mumbai crime andheri high profile sex racket exposed police rescue 9 girls from 5 states)

ADVERTISEMENT

पोलिसांनी सांगितले की, स्पा सेंटरमधून मणिपूरमधील 4, मिझोराममधील 2, मेघालयातील 1, कोलकातामधील 1 आणि लखनऊमधील 1 मुलींची सुटका करण्यात आली आहे. स्पाचा व्यवस्थापक चंद्रकांत उर्फ ​​बंटी याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तर स्पा मालक अतुल धिवर हा फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्नशील आहे. स्पा सेंटरच्या आडून सेक्स रॅकेटचा धंदा सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्पाच्या आडून सुरू होते सेक्स रॅकेट

अंधेरी पश्चिम म्हाडा परिसरात मसाज स्पाच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ‘रिव्हायव्हल वेलनेस’वर गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेने छापा टाकून 9 मुलींची सुटका केली. याशिवाय स्पा मॅनेजरलाही अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी स्पाचा मालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> महिलेला विवस्त्र करून मारहाण : पत्नीवर गुन्हा दाखल होताच सुरेश धसांची मोठी मागणी

पुण्यातही सेक्स रॅकेट उध्वस्त

काही दिवसांपूर्वीच वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आयुर्वेद स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना सातत्याने मिळालेली. त्यावर कारवाई करत पोलिसांनी एक पथक तयार करून छापा टाकला होता. यावेळी आरोपी सचिन रतन केदारी याला अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्या ताब्यातून दोन मुलींची सुटका करण्यात आली होती.

पोलिसांच्या तपासात आणि चौकशीत मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. अलीकडेच पोलिसांनी कानपूर, उत्तर प्रदेश येथील एका हॉटेलवर छापा टाकून काही तरुणी, तरुण आणि दलालांना अटक केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> अजितदादांचं वाढणार टेन्शन! शरद पवार-हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकारण काय?

मॉल रोड चौकातील फीलखाना परिसरातील हॉटेल रॉयल गॅलेक्सीमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर एडीसीपींनी प्रथम माहिती देणाऱ्याकडून ही बाब जाणून घेतली. या संपूर्ण माहितीची पुष्टी होताच फीलखाना पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह हॉटेलवर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी हॉटेलला घेराव घातला. यानंतर ते आत गेले असता त्यांना खोल्यांमध्ये मुली आणि तरुण आक्षेपार्ह अवस्थेत आढळले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT