mumbai crime : लालबाग हादरलं! कपाटात सापडला महिलेचा मृतदेह, मुलीला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Crime News Mumbai: मुंबईतील लालबाग परिसर एका घटनेनं हादरला. लालबागमधील पेरू कम्पाऊड परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचा मृतदेह एका कापडी पिशवीत बांधून कपाटात ठेवण्यात आला होता. मध्यरात्री पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह कपाटातून बाहेर काढला. पिवशीतून बाहेर काढल्यानंतर मृतदेह महिलेचा असल्याचं समोर आलं. मयत महिलेचे वय 55 वर्ष असून, या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या मुलीला अटक केली आहे. (mumbai crime news woman dead body in plastic bag in lalbagh area)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील लालबागमध्ये असलेल्या पेरू कम्पाऊंड परिसरात महिलेचा मृतदेह सापडला. एका महिलेचा मृतदेह कापडी बॅगेत टाकून कपाटात ठेवला गेला होता. याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी कपाटातून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी कापडी पिशवीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतदेह महिलेचा असल्याचं समोर आला. मृतदेह वय 50 ते 55 वर्ष वयोगटातील महिलेचा आहे.

हे वाचलं का?

Crime : शारीरिक संबंधांसाठी पत्नीचा नकार; नशेत पतीनं केलं भयंकर कृत्य

आईची हत्या करून दोन-तीन महिने लपवून ठेवला मृतेदह

महिलेचा मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी मुलीची चौकशी केली.

ADVERTISEMENT

काळा चौकी पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून मयत महिलेच्या मुलीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या मुलीचं नाव रिंपल जैन असून, तिला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

Bhagyashree Mote: रुम शोधायला गेली अन् मृत्यू; भाग्यश्रीच्या बहिणीसोबत काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 55 वर्षीय आईची रिंपल जैन हिने हत्या केली. त्यानंतर जवळपास 2 ते 3 महिने मृतदेह लपवून ठेवला. आरोपी मुलीने महिलेचा मृतदेह कपाटात लपवून ठेवल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT