नागपूर : 11 वर्षीय मुलीशी 24 वर्षीय तरुणाचे अश्लील चॅटिंग, शेवटी काय घडलं?

योगेश पांडे

Nagpur Crime : नागपुरातील जरीपटका परिसरात 11 वर्षीय मुलीशी Instagramवर अश्लील चॅट केल्याचा आरोप समोर आला आहे. व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग अपलोड करण्याची धमकी देत लग्नासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावरून 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Nagpur Crime
Nagpur Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नागपुरात 11 वर्षीय मुलीशी Instagram वर अश्लील चॅट;

point

लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप, 24 वर्षीय तरुणाला अटक

Nagpur Crime : नागपुरातील जरीपटका परिसरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर प्रकरण समोर आले आहे. 24 वर्षीय तरुणाने Instagramच्या माध्यमातून मुलीशी अश्लील चॅट केल्याचा प्रकार समोर आलाय. तसेच व्हिडिओ कॉलचे कथित रेकॉर्डिंग सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत मुलीवर लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर जरीपटका पोलिसांनी POCSO कायदा आणि IT कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 24 वर्षीय आरोपीला अटक केली असून, सध्या तपास सुरू आहे.

हेही वाचा : 'एक कोटी खोका मतदाराला धोका..' ठाकरेंचे नगरसेवक फोडताच पोस्टर्स..

संभाषणादरम्यान मुलीशी अश्लील चॅट केल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित मुलगी सहावीत शिकते. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, मुलीला तिच्या एका मैत्रिणीमार्फत Instagramवरील एक ID मिळाली होती. त्यानंतर ती आरोपीच्या संपर्कात आली. Instagramवर झालेल्या संभाषणादरम्यान मुलीशी अश्लील चॅट केल्याचा आरोप आहे. याच संभाषणादरम्यान धर्म परिवर्तन आणि लग्नासाठी मुलीवर दबाव आणल्याचाही तक्रारीत आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा : PM पदासाठी नरेंद्र मोदी एक नंबर, दुसरी पसंती राहुल गांधी अन् तिसऱ्या नंबरवर कोण?