Naigaon Crime : दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर 5 वेळा अत्याचार, बदलापूरनंतर नायगावमधील शाळेत संतापजनक प्रकार
Naigaon Crime News : नायगाव पूर्वेच्या एका खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे एक वेळ नव्हे तर तब्बल 4 ते 5 वेळा या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर पाच वेळा अत्याचार
शाळेच्या कॅन्टीन चालकाने केलं लैंगिक शोषण
अत्याचार करणार आरोपी हा अल्पवयीन आहे.
Naigaon Crime News : बदलापूरमधील दोन शाळकरी मुलींवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता वसईच्या नायगावमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर पाच वेळा अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे अत्याचार करणार आरोपी हा अल्पवयीन आहे. या घटनेने नायगावमध्ये एकच खळबळ माजली आहे. (naigaon crime news canteen boy physical assault with seven year old girl shocking crime story from naigaon vasai)
ADVERTISEMENT
नायगाव पूर्वेच्या एका खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे एक वेळ नव्हे तर तब्बल 4 ते 5 वेळा या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
हे ही वाचा : Lakhapati Didi Yojana : महिलांनो 5 लाखांची मदत मिळणार, 'लखपती दीदी' योजना नेमकी काय?
पिडीत चिमुरडी ही शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत आहे. 22 ऑगस्टला ती शाळेच्या कॅन्टीनमध्ये जायला तयार नव्हती. याबाबत शिक्षिकेने तिला विचारले असता, संबंधित कॅन्टीन चालक मला त्रास देत असल्याची तक्रार पीडित मुलीने शिक्षिकेजवळ केली होती. त्यानंतर शिक्षिकेने मुख्याध्यापकांना या घटनेची माहिती दिली होती. या घटनेनंतर मुख्याध्यापकांनी हे प्रकरण दडवून न ठेवता त्यांनी थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलीने या संदर्भात एकदा पालकांना देखील माहिती दिली होती, मात्र पालकांनी या घटनेला गांभीर्याने घेतले नाही.
हे वाचलं का?
संबंधित आरोपी मागील 15 दिवसांपासून अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे असून पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. तसेच या अगोदर इतर मुलींवर अत्याचार केला आहे का? याचा तपास देखील नायगाव पोलीस करत आहेत.
या घटनेची माहिती मुख्याध्यापक मेलविन सिक्वेरा यांनी तातडीने नायगाव पोलिसांना दिली होती. त्यानंतर नायगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी आरोपी अल्पवयीन मुलावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेचा तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : UPS, NPS आणि OPS मध्ये नेमका फरक काय? एका क्लिकवर वाचा सविस्तर माहिती
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT