UPS, NPS आणि OPS मध्ये नेमका फरक काय? एका क्लिकवर वाचा सविस्तर माहिती
Know The Difference Between UPS, NPS Ansd OPS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मंत्रिमंडळाने यूनिफाईड पेन्शन योजनेला (UPS) मंजुरी दिली आहे. ही एनडीए सरकारची नवी योजना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
UPS, NPS आणि OPS यामध्ये असलेला फरक जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत या योजनेला मंजुरी
Know The Difference Between UPS, NPS Ansd OPS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मंत्रिमंडळाने यूनिफाईड पेन्शन योजनेला (UPS) मंजुरी दिली आहे. ही एनडीए सरकारची नवी योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेसारखीच ही यूनिफाईड योजना असणार आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना NPS आणि UPS निवडण्याचा विकल्प असणार आहे.
तसच देशातील अनेक राज्यांतील जुन्या पेन्शन योजनाही (OPS) संचलित आहेत. त्यामुळे या योजनांमध्ये नेमका काय फरक आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या तिन्ही योजनांबाबत तुमचाही गोंधळ उडाला असेल, तर कोणती योजना तुमच्यासाठी चांगली ठरेल, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. (The Union Cabinet chaired by Prime Minister Narendra Modi took a major decision on Saturday. The Cabinet has approved the Unified Pension Scheme (UPS) for the pension of government employees. This is a new scheme of NDA government)
UPS, NPS आणि OPS मध्ये फरक काय?
१) UPS नुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. NPS च्या माध्यमातून खासगी आणि सरकारी असे दोन्ही कर्मचारी खातं उघडू शकतात.
२) OPS मध्ये पेन्शनसाठी वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात होत नाही. तर NPS मध्ये वेतनातून १० टक्के (बेसिक+डीए) ची कपात होते. तर UPS मध्ये हीच रक्कम कमी केली जाईल. परंतु, सरकारकडून १८.५ टक्के योगदान दिलं जाईल.










