Lakhapati Didi Yojana : महिलांनो 5 लाखांची मदत मिळणार, 'लखपती दीदी' योजना नेमकी काय?
What is Lakhpati Didi Scheme : महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
योजनेतून महिलांना 5 लाख रूपयांपर्यंत मदत केली जाते.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे.
तीन कोटी महिलांना या योजनेशी जोडण्याचा प्रयत्न
What is Lakhpati Didi Scheme : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेची प्रचंड चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. या योजनेसह केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेचीही (Lakhpati Didi Scheme) संपूर्ण देशभरात चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 5 लाख रूपयांपर्यंत मदत केली जाते. त्यामुळे ही नेमकी योजना काय आहे? हे जाणून घेऊयात. (lakhapati didi yojana of modi of government what exactly lakhapati didi scheme in know full datails pm narendra modi jalgaon)
ADVERTISEMENT
गेल्या अनेक वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारने विशेष भर दिला आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने ही योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
हे ही वाचा : UPS, NPS आणि OPS मध्ये नेमका फरक काय? एका क्लिकवर वाचा सविस्तर माहिती
5 लाख कसे मिळणार?
बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सूरू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे. या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
हे वाचलं का?
योजनेसाठी अटी काय ?
या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. तसेच लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.
हे ही वाचा : Ajit Pawar: 'माझ्या भाषेत सांगायचं तर सा&*X काढून टाकलं पाहिजे...' भर सभेत अजितदादा काय बोलले?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT