ननावरे आत्महत्या केस : आमदार बालाजी किणीकरांच्या पीएला बेड्या, बोट कापल्यानंतर पोलिसांची कारवाई
ननावरे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे पीए शशिकांत साठे, पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड व गणपती कांबळे अशा चार जणांना अटक केली होती.
ADVERTISEMENT
उल्हासनगरमध्ये 20 दिवसांपूर्वी ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येची घटना घडली होती. या प्रकरणात कोणतीच कारवाई होत नसल्याने भाऊ धनंजय ननावरे यांनी हाताचे बोट कापून गृहमंत्र्यांना भेट देणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर व्हायरल केला होता. या व्हिडिओनंतर पोलीस दल खडबडून जागे झाले होते. आता या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे पीए शशिकांत साठे, पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड व गणपती कांबळे अशा चार जणांना अटक केली होती. या चारही जणांना न्यायालयात हजर केले असता 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (nandu nanavare suicide case police arrested shashikant sathe and three other accuse)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय?
उल्हासनगरमधील राहत्या बंगल्यातील गच्चीवरून नंदकुमार ननावरे यांनी आपल्या पत्नीसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 1 ऑगस्टला घडली होती. या आत्महत्येच्या घटनेनंतर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओत आत्महत्येसाठी संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख जबाबदार धरण्यात आले होते. तसेच घटनास्थळावरून मृताच्या देहाची तपासणी करत असताना एक चिठ्ठी देखील सापडली होती.या चिठ्ठीत राष्ट्रवादी नेता कमलेश निकम, नरेश गायकवाड, आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहायक शशिकांत साठे, शिंदे गटाचे पदाधिकारी गणपती कांबळे यांची नावे लिहून त्यांना आत्महत्येस जबाबदार धरले होते. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती, तर काही बड्या हस्तींवर कारवाई झाली नव्हती.
हे ही वाचा : Crime: शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला, तरूणाने स्क्रू डायव्हरने…लिव्ह इन पार्टनरसोबत भयंकर कृत्य
भाऊ धनंजयने हाताचं बोट कापलं
दरम्यान ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणात बड्या हस्तींवर कारवाई होत नसल्याने भाऊ धनंजय ननावरे यांनी संतप्त होऊन हाताचे बोट कापून गृहमंत्र्यांना पाठणवार असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच पोलिसांकडून संथगतीने सूरू असलेल्या कारवाईवर देखील नाराजी व्यक्त केली होती.
हे वाचलं का?
धनंजय ननावरेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली आणि त्यांनी शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे पीए शशिकांत साठे, पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड व गणपती कांबळे अशा चार जणांना अटक केली होती. या चारही जणांना न्यायालयात हजर केले असता 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.
हे ही वाचा : loco pilot suicide : … आणि लोको पायलटने आयुष्यच संपवलं, कल्याणमधील घटना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT