लग्न केलं पण शारीरिक संबंधच ठेवले नाही, वैतागलेल्या बायकोने…
लग्न होऊन तीन महिने उलटून देखील नवऱ्याने बायकोशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. तसेच बायकोच्या (Wife) जवळ जाण्यासाठी 10 लाख रूपयांचा हुंडा मागत आहे. नवऱ्याच्या या वागण्यावर संतापून बायकोने आता पोलीस (Police) ठाण्यात धाव घेतली आहे.
ADVERTISEMENT
देशभरात लग्नसराई सूरू आहे.अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. अशात एका लग्नाची गोष्ट समोर आली आहे. या लग्नात एका जोडप्याचं तीन महिन्यापुर्वी लग्न झालं होतं. मात्र लग्न होऊन तीन महिने उलटून देखील नवऱ्याने बायकोशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. तसेच बायकोच्या (Wife) जवळ जाण्यासाठी 10 लाख रूपयांचा हुंडा मागत आहे. नवऱ्याच्या या वागण्यावर संतापून बायकोने आता पोलीस (Police) ठाण्यात धाव घेतली आहे. ही घटना पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे. (newly married wife reach police station against husband shocking crime story)
ADVERTISEMENT
हनीमुनसाठी मागितले 10 लाख
बदायूच्या बिसौली परिसरात राहणाऱ्या एका तरूणाशी 6 फेब्रुवारी 2023 रोजी तरूणीचे लग्न झाले होते. या लग्नात मुलीकडच्यांनी लग्नात 20 लाखाचा खर्च केला होता. यासोबत 15 लाखांचे दागिने देखील दिले होते. मात्र दोघांच्या लग्नाच्या तीन महिन्यानंतर देखील नवऱ्याने (Husband) तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नव्हते. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून महिलेने सर्वात आधी 29 मार्चला सासूकडे याबाबतची तक्रार केली होती. पण तिच्या सासूने यावर लक्षच दिले नाही. त्यामुळे मग नंतर तरूणीने तिच्या आईजवळ नवऱ्याची तक्रार केली. या दरम्यान 22 एप्रिलला जेव्हा जावई त्याच्या सासरवाडीत आला तेव्हा, सासूच त्याला थेट सवाल विचारला. जर तुम्हाला काही आजार असेल तर सांगा त्यावर उपचार करून घेऊ. यावर जावयाने त्यांना थेट, 10 लाख रूपये द्या हनीमुनवर जातो असे म्हटले होते. या घटनेनंतर नवरीने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
हे ही वाचा : बायकोचं ‘ते’ सत्य आलं समोर, पतीला बसला मोठा धक्का! नंतर…
बायकोने पोलीस ठाण्यात (Police) दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाला तीन महिने उलटून गेले आहेत, मात्र अद्यापही नवऱ्याने शारीरीक संबंध ठेवले नाही आहेत. याउलट 10 लाख रूपये हुंड्याचे घेऊन ये, मग हनीमूनला जाऊ, असे सांगत असल्याचा गंभीर आरोप नवरीने करत नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीलीभीत पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.
हे वाचलं का?
बायकोचे काढले अश्लील फोटो
लग्नाच्या वेळेस दोघांच्या कुटुंबियांमध्ये 5 लाखांच्या हुंड्याच्या देवाण-घेवाणीबाबत चर्चा झाली होती. या चर्चेनंतर हे जोडपं हनीमुनसाठी नैनीतालला गेले होते. या हनीमुन दरम्यान नवऱ्याने तिचे अश्लील फोटो काढले होते. मात्र तिच्या जवळ तो अजिबात गेला नव्हता. त्यामुळे हे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने आणखीण 5 लाखाच्या हुंड्याची मागणी केली होती. म्हणजेचे आता तिच्याकडून त्याला 10 लाखांचा हुड्डा हवा होता.मात्र मुलीकडचे हा हड्डा देण्यात असमर्थ होते. म्हणूनच नवरीने 13 मे ला पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
हे ही वाचा : बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड.. गर्लफ्रेंडसोबत क्रूरपणाचा कळस
दरम्यान बायकोची ही तक्रार पाहून पोलीसही चक्रावले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.या प्रकरणात आता पोलीस काय अॅक्शन घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्येही घटना घडली आहे. या घटनेची गावात एकच चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT