हनीमूनच्या दिवशी नवऱ्याने बेडरूममध्ये लावला हिडन कॅमेरा, प्रायव्हेट व्हिडीओ बनवून दुबईच्या मित्रांना पाठवला अन्...

मुंबई तक

पीडितेने सांगितलं की हनीमूनच्या दिवसापासून पतीने बेडरूममधील बरेच खाजगी व्हिडीओ बनवले आणि ते व्हिडीओ त्याने दुबईत राहणाऱ्या त्याच्या मित्राला पाठवले.

ADVERTISEMENT

प्रायव्हेट व्हिडीओ बनवून दुबईच्या मित्रांना पाठवला अन्...
प्रायव्हेट व्हिडीओ बनवून दुबईच्या मित्रांना पाठवला अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हनीमूनच्या दिवशी नवऱ्याने बेडरूममध्ये लावला हिडन कॅमेरा

point

प्रायव्हेट व्हिडीओ बनवून दुबईच्या मित्रांना पाठवला

Crime news: कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एक तरुण आधीच विवाहित असून त्याने दुसरं लग्न केलं. केवळ हुंड्यासाठी त्याने असं कृत्य केलं. मात्र, दुसरं लग्न झाल्यानंतर संबंधित तरुण आपल्या नव्या बायकोचा सतत छळ करायचा. पीडितेने सांगितलं की हनीमूनच्या दिवसापासून पतीने बेडरूममधील बरेच खाजगी व्हिडीओ बनवले आणि ते व्हिडीओ त्याने दुबईत राहणाऱ्या त्याच्या मित्राला पाठवले. इतकेच नव्हे तर पीडितेला तिच्या नवऱ्याने त्याच्या मित्रांसोबत झोपण्यासाठी सुद्धा भाग पाडलं. शेवटी, पत्नीने वैतागून पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित प्रकरण पुट्टेनहल्ली पोलीस स्टेशन परिसरातील असल्याची महिती आहे. 

बेडरूममधील प्रायव्हेड व्हिडीओ बनवले 

आपल्या पतीचे पूर्वीपासूनच 19 महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा बायकोने दावा केला. सप्टेंबर 2024 मध्ये सैय्यद इनामुल नावाच्या तरुणासोबत लग्न झाल्याचं पीडितेने सांगितलं. तसेच, तो आधीच विवाहित असल्याचं तरुणाने पत्नीपासून लपवून ठेवलं. त्यानंतर, मधुचंद्राच्या दिवशी सेय्यदने आपल्या खोलीत हिडन कॅमेरे लपवून  दुसऱ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचा व्हिडीओ बनवला. 

हे ही वाचा: "मेकअप आर्टिस्ट बनवतो..." हॉटेलमध्ये बोलवलं, ड्रिंक पाजलं आणि संपूर्ण रात्र... अनेक शहरात बोलवून केलं 'ते' कृत्य!

बऱ्याच महिलांसोबत पतीचे अनैतिक संबंध 

तसेच, सय्यदने गुप्तपणे खोलीत एक कॅमेरा बसवला आणि दररोज खाजगी व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर आरोपी तरुण ते व्हिडीओ दुबईतील त्याच्या मित्रांना पाठवायचा. याबद्दल पीडितेला समजल्यानंतर तिचा तिच्या पतीसोबत मोठा वाद झाला आणि त्यानंतर त्याने पत्नीला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. इतकेच नव्हे तर आरोपीने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषांसोबत झोपण्यास भाग पाडलं. आरोपी तरुण सतत आपल्या पत्नीला म्हणायचा, की "माझे 19 महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत आणि तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीस." त्यावेळी आरोपी पतीने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याची धमकी देण्यास सुरुवात केली असल्याचं पत्नीने सांगितलं. 

हे ही वाचा: आजीचं 35 वर्षीय तरुणावरच जडलं प्रेम! लपुनछपून दोघेही भेटायचे अन् एके दिवशी तर... प्रकरण थेट पोलिसात

"इतका 'हुंडा' दिला होता..."

अखेर पतीच्या वागण्याला वैतागून पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. आपल्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचं कळताच आरोपी पती अचानक पळून गेला. सध्या, पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेने तक्रार करताना सांगितलं की "आमच्या कुटुंबियांनी अगदी धुमधडाक्यात लग्न लावून दिलं होतं. सैय्यदने सांगितल्याप्रमाणे, हुंडा देखील देण्यात आला होता. लग्नात हुंडा म्हणून एक यामाहा बाइक, 340 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पैसे सुद्धा दिले होते. त्यामुळे मला न्याय हवा आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp