"मेकअप आर्टिस्ट बनवतो..." हॉटेलमध्ये बोलवलं, ड्रिंक पाजलं आणि संपूर्ण रात्र... अनेक शहरात बोलवून केलं 'ते' कृत्य!

मुंबई तक

एका 25 वर्षीय तरुणीसोबत काही तरुणांनी बरीच आमिष दाखवून घृणास्पद कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. पीडित तरुणी ही ब्यूटिशियन असून ती मॉडलिंग सुद्धा करते.

ADVERTISEMENT

ड्रिंक पाजलं आणि संपूर्ण रात्र... नेमकं काय घडलं?
ड्रिंक पाजलं आणि संपूर्ण रात्र... नेमकं काय घडलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलमध्ये बोलवलं, ड्रिंक पाजलं आणि संपूर्ण रात्र...

point

मेकअप आर्टिस्ट बनवण्याचं आमिष अन् अनेक शहरात बोलवून केलं 'ते' कृत्य!

Crime News: मध्य प्रदेशातील भोपालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 25 वर्षीय तरुणीसोबत काही तरुणांनी बरीच आमिष दाखवून घृणास्पद कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. पीडित तरुणी ही ब्यूटिशियन असून ती मॉडलिंग सुद्धा करते. अहमदाबाद आणि मध्य प्रदेशातील काही तरणांनी पीडितेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला धमकी दिल्याचे गंभीर आरोप सुद्धा करण्यात आले आहेत. खरंतर, हे प्रकरण सोशल मीडियावरील एका ग्रुपच्या माध्यमातून घडल्याचं सांगण्यात येत आहे. अखेर पीडितेने धाडस दाखवून यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी लगेच कारवाई केल्याने प्रकरणाचा खुलासा झाला. 

अश्लील व्हिडीओ बनवला अन् व्हायरल करण्याची धमकी 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पीडितेने पोलिसात प्रकरणाबाबत तक्रार करताना सांगितलं की सोशल मीडियावर एका ग्रुपच्या माध्यमातून अहमदाबादच्या ओढव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाच्या ती संपर्कात आली. संबंधित तरुणाने पीडितेला मेकअप आर्टिस्ट म्हणून काम देण्याचं आमिष दाखवलं आणि तिला अहमदाबादला बोलवून घेतलं. आरोपींच्या सांगण्यावरून पीडिता 5 जुलै रोजी अहमदाबादला पोहोचली. त्यावेळी, आरोपीने तिला आपल्या नावावर हॉटेलमध्ये चेक-इन करण्यास सांगितलं. काही दिवसांनंतर, 9 जुलै रोजी आरोपी हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याने पीडित तरुणीला एक ड्रिंक प्यायला दिलं. ते ड्रिंक प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली. अचानक, मध्यरात्री तरुणीला जाग आल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा तिला संशय आला. याबद्दल पीडितेने जाब विचारला असता या घटनेबद्दल कोणालाही सांगितलं की तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची आरोपीने तिला धमकी दिली. त्यामुळे तरुणी घाबरूव हॉटेलमध्येच थांबली. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता रात्री सुद्धा दुकाने राहणार खुली! प्रशासनाचा मोठा निर्णय अन् कामगारांना सुट्टी सुद्धा...

साथीदारांनी सुद्धा मिळून केला बलात्कार 

अखेर, पीडितेने 11 जुलै रोजी भोपालला परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही दिवसांनंतर आरोपीने पीडितेला पुन्हा फोन करण्यास सुरूवात केली. त्यानंतर, मध्य प्रदेशचा रहिवासी असलेल्या दुसऱ्या तरुणाने पीडितेला फोन केला. त्यावेळी, पीडितेचे ओढवच्या आरोपीसोबतचे व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दुसऱ्या आरोपीने दावा केला. त्या आरोपीने तरुणीला धमकी देऊन होशंगाबाद जिल्ह्यातील पिपरिया येथे तिला बोलवलं आणि तिथे त्याने पीडित तरुणीवर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर, त्याच्या इतर साथीदारांनी सुद्धा मिळून परिसरातील बऱ्याच हॉटेलमध्ये पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भाग पाडलं. व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे ती घाबरून गप्प राहिली असल्याचं तरुणीने सांगितलं. पण, अखेर धाडसाने पीडितेने पोलिसांना या प्रकरणाबद्दल सांगितलं. 

हे ही वाचा: Govt Job: 'या' बँकेत निघाली मोठ्या पदांवर भरती! लाखोंचा पगार अन्... कसं कराल अप्लाय?

आरोपींचा शोध 

बुधवारी ओढव पोलिसांनी घटनेबाबत एफआयआर नोंदवला असून पोलीस आता हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत. पीडितेची मेडिकल टेस्टसुद्धा केली जात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 64(1) बलात्कार,  351(3) धमकी आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp