मुंबईची खबर: आता रात्री सुद्धा दुकाने राहणार खुली! प्रशासनाचा मोठा निर्णय अन् कामगारांना सुट्टी सुद्धा...
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात दुकाने 24 तास खुली राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आता रात्री सुद्धा दुकाने राहणार खुली!

महाराष्ट्र प्रशासनाचा मोठा निर्णय
Mumbai News: महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात दुकाने 24 तास खुली राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात श्रम विभागाकडून शासनादेश जाहीर केले आहेत. याअंतर्गत, दररोज दुकाने 24 तास खुली राहू शकतील. मात्र, दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यात 24 तासांची म्हणजेच एक दिवसाची सुट्टी देणं आवश्यक असल्याची अट निश्चित करण्यात आली आहे. बऱ्याच काळापासून दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेबाबत बराच गोंधळ झाला होता. मात्र, जीआर जाहीर झाल्यापासून ही बाब पूर्णपणे स्पष्ट झाली आहे.
'हा' फायदा होणार
श्रम विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कित्येक वेळा दुकानदार आपली दुकाने अधिक काळ खुली ठेवण्यासाठी परवानगी मागतात. आता सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना सरकारी कार्यालयात अनावश्यक फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
दुकाने 24 तास खुली ठेवण्याचा हा निर्णय मुंबईसारख्या शहरांमध्ये गेमचेंजर ठरू शकतो. मात्र, यामध्ये बार आणि वाइन शॉपचा समावेश नसल्याचं देखील सांगितलं जात आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याकारणाने केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकाचं सुद्धा येथे 24 तास येणं-जाणं असतं. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी मार्केट बंद असल्यामुळे लोकांच्या खूप तक्रारी येत होत्या.
हे ही वाचा: Govt Job: 'या' बँकेत निघाली मोठ्या पदांवर भरती! लाखोंचा पगार अन्... कसं कराल अप्लाय?
मुंबईतच जवळपास 10 लाख दुकाने
एकट्या मुंबईतच जवळपास 10 लाख दुकाने असल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी नाईट लाइफची मागणी बऱ्याच काळापासून वाढत असल्याचं पाहायला मिळतं. आतापर्यंत दुकाने 24 तास उघडी ठेवण्याबाबत कोणतीच स्पष्टता नव्हती. अनेक लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी, या मुद्द्यावर कोणतीच स्पष्टता नसल्याकारणाने रात्रीच्या वेळी दुकाने बंद करण्यात येत होती आणि याचा विरोध सुद्धा केला जात होता.