Iran-Israel युद्धाची झळ भारतीयांपर्यंत, ड्रोन हल्ल्यात मुंबईतील युवकाचा मस्कतमध्ये मृत्यू; महिन्याभरापूर्वीच आईचंही निधन
Iran Israel War : दीक्षित सोलंकी हे मूळचे दीव येथील रहिवासी होते, मात्र रोजगारासाठी ते काही वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि कांदिवलीत स्थायिक झाले होते. त्यांचे वडील अमृतलाल सोलंकी हे दीवमधील मासळी व्यावसायिक आहेत. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच दीक्षित यांच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यविधीनंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते, मात्र ही त्यांची शेवटची भेट ठरली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Iran-Israel युद्धाची झळ भारतीयांपर्यंत
ड्रोन हल्ल्यात मुंबईतील युवकाचा मस्कतमध्ये मृत्यू
महिन्याभरापूर्वीच आईचंही निधन
Iran Israel War, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची झळ आता थेट भारतीयांना सोसावी लागत आहे. मस्कतच्या समुद्री सीमेत झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इराण आणि इस्रायल- अमेरिकेत पेटलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गावरील सुरक्षा धोक्यात आली आहे. या युद्धाचा फटका आता मुंबईला बसला असून, ओमानच्या आखातात (Gulf of Oman) मस्कत जवळ एका मालवाहू तेलवाहू टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या कांदिवली येथील 25 वर्षीय दीक्षित सोलंकी या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षित सोलंकी हे “MKD Vyom” नावाच्या 'मार्शल आयलंड्स'चा ध्वज असलेल्या ऑइल टँकरवर क्रू मेंबर म्हणून कार्यरत होते. मस्कतच्या किनाऱ्यापासून साधारण 52 नॉटिकल मैल अंतरावर असताना, स्फोटकांनी भरलेल्या एका ड्रोन बोटीने या टँकरला धडक दिली. हा हल्ला इतका भीषण होता की टँकरच्या इंजिन रूममध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत दीक्षित यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा : भारताचा 'हा' जुना मित्र बनणार संकटमोचक, 95 लाख बॅरल कच्चे तेल पाठवणार; भारताकडे 'इतकाच' तेलसाठा शिल्लक
महिनाभरापूर्वीच झाला होता मातृशोक
दीक्षित सोलंकी हे मूळचे दीव येथील रहिवासी होते, मात्र रोजगारासाठी ते काही वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि कांदिवलीत स्थायिक झाले होते. त्यांचे वडील अमृतलाल सोलंकी हे दीवमधील मासळी व्यावसायिक आहेत. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच दीक्षित यांच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यविधीनंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते, मात्र ही त्यांची शेवटची भेट ठरली.










