PUBG गेम खेळताना मैत्री, तरुणीला हॉटेलवर बोलवून न्यूड Video केला शूट; अन्…

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Crime News: जयपूर: हरियाणातील एका तरुणाने जयपूरमधील एका मुलीशी ऑनलाइन गेमद्वारे (Online Game) मैत्री केली आणि त्यानंतर दोघांनी पार्टनर म्हणून PUBG खेळायला सुरुवात केली. या खेळात तरुणाने तरुणीला आपल्या जाळ्यात अडकवले आणि तो तिला भेटण्यासाठी जयपूरला गेला. यानंतर त्याने मुलीला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले, त्यानंतर मुलगी त्याला भेटायला देखील गेली. पण इथे जे घडलं त्याने तरुणीला प्रचंड धक्का बसला आहे. (playing pubg game made friends with youth invited the girl to the hotel and shot a nude video and blackmailed crime news)

जेव्हा तरुणी हॉटेलवर पोहचली तेव्हा तरुणाने एक भयंकर कृत्य केलं. त्याने तरुणीचा न्यूड व्हिडीओ शूट करुन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याशिवाय आरोपी तरुणाने पीडितेवर तब्बल दोन वर्षात अनेकवेळा बलात्कार (Rape) केला. पण आपली बदनामी होईल या भीतीने तिने याची कुठेही वाच्यता केली नव्हती. मात्र अखेर या सगळ्या प्रकाराला त्रासून पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केली.

2019 मध्ये PUBG गेममुळे झालेली तरुणाशी ओळख

जयपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या अहवालानुसार, प्रतापनगर हल्दीघाटी मार्गाजवळ राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने सांगितले की, ती सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती आणि मोकळ्या वेळेत ऑनलाइन गेम HAFO खेळत असे. सप्टेंबर 2019 मध्ये, गेम खेळत असताना, हरियाणातील शुभम नावाच्या तरुणाशी तिचे चॅटिंग सुरू झालं. त्यानंतर दोघांनी पार्टनर म्हणून PUBG खेळायला सुरुवात केली. PUBG गेम खेळत असताना दोघांमध्ये बरंच चॅटिंग देखील व्हायचं. याचाच फायदा घेत आरोपी तरुणाने तरुणीचा मोबाइल नंबर मागितला. तरुणीने देखील तिचा मोबाइल नंबर दिला. ज्यानंतर दोघांमध्ये मोबाइलवरुन कॉलवर बोलणं सुरू झालं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Crime news : …म्हणून गर्लफ्रेंडचा मोबाईल केबलनेच घोटला गळा अन् अंगणात फेकला मृतदेह

तरुणीला भेटण्यासाठी पोहचला थेट जयपूरला, अन्…

यानंतर जुलै 2021 मध्ये आरोपी तरुण तरुणीला भेटण्यासाठी जयपूरला पोहोचला. जिथे त्याने गांधीनगर रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि नंतर तरुणीला भेटण्याच्या बहाण्याने तिथे बोलावले. जेव्हा ती हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा सुरुवातीला आरोपीने सामान्य संभाषण सुरू केले. परंतु त्यानंतर त्याने तिच्याशी जबरदस्ती केली आणि अश्लील संभाषण सुरू केलं. यानंतर पीडितेवर बलात्कार केल्यानंतर त्याने तिचा अश्लील व्हिडीओ देखील बनवला.

हे ही वाचा >> प्रेम, अपहरण आणि गँगरेप… गर्लफ्रेंडच्या अब्रूचे मित्रांसोबत महिनाभर तोडले लचके

त्यानंतर लग्नाचं आश्वासन देत तब्बल 2 वर्ष त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच ब्लॅकमेल करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पण अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तरुणाच्या घाणेरड्या कृत्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT