पोलीस आत शिरले अन् त्यांना 5 तरूण आणि 6 मुली 'नको ते' करताना त्याच अवस्थेत सापडले, कशी मिळालेली टिप?
मथुरामध्ये एका स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्यांना एकाच वेळी पाच तरुण आणि सहा तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. ज्यानंतर या अकराही जणांना अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT

मथुरा: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून एक मोठं सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. ज्यावेळी पोलिसांनी हा छापा टाकला तेव्हा त्यांना 5 तरुण आणि 6 तरुणी या अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत आढळले. त्यामुळे त्यांना रंगेहाथ पकडत पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या या अत्यंत आक्रमक आणि झटपट कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महिला पोलीस अधिकारी आशना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी स्पा सेंटरमधून काही आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त केले आहे. या छाप्यादरम्यान 11 जण हे आक्षेपार्ह स्थितीत पकडले गेले.
हे ही वाचा>> परदेशात पळून जाण्यापूर्वी निलेश घायवळने मामाच्या शेतात लपवलेली 'ती' गोष्ट, पोलिसांच्या हाती...
मथुराच्या विकास बाजारातील स्पा सेंटरमध्ये गेल्या काही काळापासून पोलिसांना अनैतिक कृत्य होत असल्याची कुणकुण लागली होते. या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देत मथुरा पोलिसांनी प्रथम स्वतःहून या सेंटरची चौकशी केली. जेव्हा त्यांना मिळालेली माहिती योग्य आहे याची पुष्टी झाली तेव्हा पोलिसांनी धडक कारवाई करायचं ठरवलं. त्यानुसार पोलीस पथकाने एकाच वेळी दोन्ही स्पा सेंटरवर छापा टाकला, ज्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला.
5 तरुण आणि 6 तरुणींना अटक
छापादरम्यान, पोलीस पथक स्पा सेंटरमध्ये घुसले आणि तरुण आणि महिलांना आक्षेपार्ह स्थितीत पाहून त्यांना धक्का बसला. त्यांना ताबडतोब ताब्यात घेण्यात आले. शहर पोलीस अधीक्षक (सीओ) अशना चौधरी म्हणाल्या की, 'अनैतिक कृत्यांबद्दल माहिती मिळाल्यानंतर आम्ही दोन स्पा सेंटरवर छापा टाकला. पोलिसांना 5 तरुण आणि 6 तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आले.' अशी माहिती त्यांनी दिली.










