भाऊबीजेच्या दिवशीच सख्ख्या बहिणीची चाकूने भोसकून हत्या! भावाने का केलं असं निर्दयी कृत्य?
दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशीच एका तरुणाने त्याच्या 16 वर्षीय सख्ख्या बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असून पीडितेच्या सख्ख्या भावाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाऊबीजेच्या दिवशीच सख्ख्या बहिणीची चाकूने भोसकून हत्या!
भावाने का केलं असं निर्दयी कृत्य?
Crime News: दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशीच एका तरुणाने त्याच्या 16 वर्षीय सख्ख्या बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पीडितेच्या सख्ख्या भावाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. भाऊबीजेच्या दिवशीच भावाने आपल्या बहिणीची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पीडितेवर चाकूने वार करून हत्या
23 ऑक्टोबर रोजी बांगरमऊ पोलीस स्टेशन हद्दीतील चिंगरपुरवा गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पीडितेच्या सख्ख्या भावानेच तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला म्हणजेच मृत तरुणीच्या भावाला अटक केली आहे. सुरूवातीला पीडितेच्या चुलत भावावर तिच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासादरम्यान तो निर्दोष असल्याचं सिद्ध झालं.
प्रकरणाचा आणखी खोल तपास केला असता पीडित तरुणीच्या सख्ख्या भावानेच आपल्या बहिणीची हत्या केल्याचं समोर आलं. आरोपी अंकितने त्याच्या बहिणीची हत्या करून त्याचा आरोप आपल्या चुलत भावावर लावण्याचा कट रचला होता.
हे ही वाचा: तरुण रुग्णालयातील वॉशरूममध्ये गेल्यानंतर नर्सने विनयभंग केला... आता तुरुंगवास आणि चाबकाच्या फटक्यांची शिक्षा
प्रियकरासोबत सतत फोनवर बोलायची
पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी अंकितने पोलिसांना सांगितलं की, त्याची लहान बहीण सफीपुर येथे राहणाऱ्या एका तरुणासोबत फोनवर सतत बोलायची. आपल्या बहिणीचं त्या तरुणासोबत बोलणं अंकितला अजिबात पटत नव्हतं. त्याने त्याच्या बहिणीच्या कृत्याला वारंवार विरोध केला. पण, तिने भावाचं ऐकण्यास स्पष्ट नकार दिला. रागाच्या भरात त्याने संधी साधून आपल्या बहिणीची चाकू भोसकून हत्या केली.










