तरुण रुग्णालयातील वॉशरूममध्ये गेल्यानंतर नर्सने विनयभंग केला... आता तुरुंगवास आणि चाबकाच्या फटक्यांची शिक्षा
रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या एका भारतीय नागरिकावर हॉस्पिटलमध्ये आलेल्या एका व्यक्तीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकरणातील आरोपीला न्यायालयाकडून गंभीर शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रुग्णालयातील वॉशरूममध्ये गेल्यानंतर नर्सने विनयभंग केला...
तुरुंगवास आणि चाबकाच्या फटक्यांची शिक्षा
Crime News: सिंगापुरच्या रॅफल्स रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या एका भारतीय नागरिकावर हॉस्पिटलमध्ये आलेल्या एका व्यक्तीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीचं नाव एलिपे शिवा नागु (34) असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी न्यायालयाकडून आरोपी व्यक्तीला 14 महिन्यांचा तुरुंगवास आणि सिंगापुरात प्रचलित असलेली दोन चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
नर्सने तरुणाचा विनयभंग केला...
जून 2025 मध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. घटनेतील पीडित तरुणाच्या आजोबांवर रॅफल्स रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्या दिवशी, पीडित व्यक्ती तिच्या आजोबांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेली होती. संध्याकाळी जवळपास 7:30 वाजताच्या सुमारास पीडित तरुण स्वच्छतागृहात गेला. टॉयलेटला गेल्यानंतर पीडित व्यक्ती हात धुण्यासाठी बाहेर आली. त्यावेळी, एलिपेने आत डोकावून पाहिलं आणि त्या तरुणाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपी नर्सने त्या तरुणाला निर्जंतुक करण्याच्या बहाण्याने त्याच्या हाताला साबण लावला.
हे ही वाचा: लव्ह मॅरेजचा हट्ट, घरात सतत वाद... आई आणि भावाने मिळून केली तरुणीची निर्घृण हत्या! ऑनर किलिंगची भयानक घटना
तक्रारीनंतर आरोपीला अटक
खरंतर, या घटनेमुळे पीडित तरुणाला मोठा धक्का बसला. त्यानंतर, तो गुपचूप स्वच्छतागृहातून बाहेर पडला आणि त्याच्या आजोबांच्या वॉर्डमध्ये गेला. संबंधित तरुणाने 21 जून रोजी नर्सकडून त्याचा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या दोन दिवसांनंतर नागुला अटक केली. या घटनेनंतर, रुग्णालयाने लगेच नागुला निलंबित केलं आणि त्याला त्याच्या नर्सिंग ड्युटीवरून काढून टाकलं.
हे ही वाचा: बायको सोडून गेली, रिक्षा चालक बापाकडून 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार; पोटदुखीमुळे उघडकीस आला प्रकार
सिंगापूरमध्ये विनयभंग झाल्याच्या घटना अतिशय गांभीर्याने घेतल्या जातात. याच कारणामुळे अशा प्रकरणातील आरोपींना बऱ्याचदा तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. याशिवाय, सिंगापूरमध्ये चाबकाचे फटके मारणे ही देखील एक प्रचलित शिक्षा आहे आणि म्हणूनच आरोपींना तुरुंगवासाच्या शिक्षेसोबत चाबकाच्या फटक्यांची शिक्षा ठोठावण्यात येते.










