बायको सोडून गेली, रिक्षा चालक बापाकडून 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार; पोटदुखीमुळे उघडकीस आला प्रकार
Crime News : बापाकडून 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार; पोट दुखू लागल्यानंतर सगळंच उघडकीस आलं, संपूर्ण परिसरात संतापाचा लाट
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायको सोडून गेली, बापाकडून 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार
पोट दुखू लागल्यानंतर सगळंच उघडकीस आलं
Crime News : फरीदाबाद येथील वल्लभगडमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका बापाने त्याच्या 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होता. मुलगी आजारी पडली आणि तिच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात गेली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रिक्षा चालक बापाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे.
बायको सोडून गेल्यानंतर बापाने मुलीवर केले अत्याचार
अधिकची माहिती अशी की, पीडित मुलगी ही इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. रिक्षा चालकाच्या दारुच्या व्यसनामुळे आणि मारहाणीमुळे त्याची बायको 6 पैकी 2 मुलांना घेऊन निघून गेली. ती तिच्या बहिणीसोबत राहू लागली. मात्र,दुसरीकडे पीडित मुलगी त्याच्या छोट्या भावांसोबत बापासोबतच राहात होती. मात्र, यावेळी बापाने त्याच्याच 14 वर्षीय मुलीवर 2 महिने अत्याचार केलाय.
पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले की, हे प्रकरण पीडित मुलीला तिच्या शेजारच्या वृद्ध महिलेने रुग्णालयात उपचारांसाठी नेल्यानंतर समोर आले आहे. मुलीला पोटदुखीचा त्रास होत होता. शिवाय तिला ताप देखील आला होता. शेजारच्या महिलेने तिला डॉक्टरांकडे नेलं होतं. तेव्हा पीडित मुलीने तिच्यासोबत बाप दुष्कृत्य करत असल्याचं सांगितलं. महिलेने तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस त्याठिकाणी पोहोचले.










