लव्ह मॅरेजचा हट्ट, घरात सतत वाद... आई आणि भावाने मिळून केली तरुणीची निर्घृण हत्या! ऑनर किलिंगची भयानक घटना
एका महिलेने तिच्या मुलासोबत आपल्याच मुलीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर, हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी दोन्ही आरोपींनी मृतदेह डॅममध्ये फेकून दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लव्ह मॅरेजचा हट्ट, घरात सतत वाद...
आई आणि भावाने मिळून केली तरुणीची निर्घृण हत्या!
ऑनर किलिंगची भयानक घटना
Crime News: गुजरातच्या भावनगरमधून ऑनर किलिंगची भयानक घटना समोर आली आहे. येथील भीकाडा गावात एका महिलेने तिच्या मुलासोबत आपल्याच मुलीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर, हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी दोन्ही आरोपींनी मृतदेह डॅममध्ये फेकून दिला. मात्र, मृत तरुणीच्या वडिलांना या घटनेबद्दल माहिती मिळताच त्यांनी आपली पत्नी आणि मुलाच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
प्रियकरासोबतच लग्न करण्याचा हट्ट
तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की, जवळपास एक वर्षापूर्वी त्यांच्या पारुल नावाच्या 22 वर्षीय मुलीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून विवेक नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर, ते दोघेही एकमेकांसोबत बोलायचे. त्यावेळी, अचानक त्यांचा मुलगा प्रकाश याने त्याच्या बहिणीला विवेकशी बोलताना पकडलं. पारुलने विवेकसोबत लग्न करण्याचा हट्ट धरला आणि याच कारणामुळे त्यांच्या घरात सतत वाद व्हायचे. पीडितेची आई दयाबेन आणि तिचा भाऊ तरुणीला सतत विवेकपासून दूर राहण्यास सांगायचे.
मात्र, पारुलने विवेकसोबतच लग्न करण्याचा हट्ट सोडला नाही. खरंतर, या कारणामुळे पारुलच्या भावाचं लग्न ठरण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे, घरात सतत भांडणं व्हायची. दरम्यान, 18 ऑक्टोबर रोजी पारुलला पुन्हा एकदा तिच्या आईने इंस्टाग्रामवर विवेकशी बोलताना पाहिलं.
पीडितेला लव्ह मॅरेज करायचं होतं...
त्यानंतर, दयाबेनने तिच्या मुलाला फोन करून घरी बोलवून घेतलं आणि प्रकाश घरी आल्यानंतर दोघांनी पारुलला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पीडितेने लव्ह मॅरेज केल्याने इतर दोन्ही मुलांच्या लग्नात अडचणी येऊ शकतात, असं देखील त्यांनी पारुलला सांगितलं. पण, तरुणीने तिच्या आई आणि भावाचं अजिबात ऐकलं नाही आणि ती विवेकसोबत पळून जाऊन लग्न करण्याची धमकी दिली.










