Pune Crime : पुण्यात कोयता गँगचा हैदोस! मध्यरात्री बघा काय करून ठेवलं…

मुंबई तक

ADVERTISEMENT

A group of six people of kayta gang vandalized 40 parked vehicles in pune.
A group of six people of kayta gang vandalized 40 parked vehicles in pune.
social share
google news

Pune Crime News : पुण्यात पुन्हा एकदा कोयत्या गॅंगची दहशत पाहायला मिळाली आहे. पुण्यातील सहकारनगर भागात तब्बल 40 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री साडेतीन वाजता ही घटना घडली.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जणांचे टोळके एका व्यक्तीला शोधण्यासाठी तळजाई परिसरात आले होते. त्यावेळी ती व्यक्ती न सापडल्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांची यावेळी तोडफोड करण्यात आली. कोयते, लोखंडी गड, लाठ्यांनी ही तोडफोड करण्यात आली. टोळक्याच्या दहशतीमुळे नागरिकही त्यांच्या घराच्या बाहेर पडले नाहीत.

पुण्यात कोयता गँगने केलेल्या तोडफोडीत वाहनांचे झालेले नुकसान.

 

हे वाचलं का?

या घटनेच्या एक दिवस आधीच अशाच टोळक्यांकडून वारजे भागातील ७ गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांची तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच सहकारनगरमध्ये दुसरी घटना घडली.

हेही वाचा >> Lok Sabha : भाजपचं मिशन-80 काय?; खासदारांना फॉर्ममधून द्यावा लागणार हिशोब

दरम्यान या आधी देखील पुण्यातील कोयता गॅंगचा मुद्दा चर्चेत आला होता. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी थेट विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला होता. त्यानंतर अनेक गुंडांवर पुण्यात कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर कोयते विकणाऱ्यांना विकत घेणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्यास सांगण्यात आले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

 

हेही वाचा >> Pune : दर्शना पवारची हत्याच! दोघे राजगडावर गेले, पण राहुल एकटाच आला खाली

आता पुन्हा पुण्यात या कोयता गॅंगने पुण्यात डोकं वर काढलं असून गाड्यांची तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे यावर पोलीस आता काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT