Crime Patrol चे 1300 भाग पाहिले, तुकड्यांमध्ये जाळलं; दोन वर्षानंतर कशी उलघडली Murder मिस्ट्री?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Rajasthan Udaipur Crime Accussed Watched 1300 episods of Crime Patrol and murdered his live in partner
Rajasthan Udaipur Crime Accussed Watched 1300 episods of Crime Patrol and murdered his live in partner
social share
google news

Rajasthan Murder News : राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूरमध्ये (Udaipur) क्राईम पेट्रोलचे (Crime Patrol) 1300 हून अधिक एपिसोड पाहिल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या केली. दोन वर्षे तो पोलिसांची नजर चुकवून होता. मात्र शस्त्रास्त्र कायद्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला अटक केल्यावर दोन वर्षांपूर्वी झालेल्या मर्डर मिस्ट्रीची कहाणी उघड झाली. (Rajasthan Udaipur Crime Accussed Watched 1300 episods of Crime Patrol and murdered his live in partner)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप नगर पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कारवाई करत राहुल राज चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. त्याची चौकशी केली असता भानुप्रिया नावाच्या महिलेच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचं गूढ उकललं.

वाचा : Ayodhya Ram Mandir Live: ‘शिवाजी राजांना संन्यास घ्यायचा होता..’, PM मोदींसमोर ‘त्या’ महाराजांचं वक्तव्य

भानुप्रियासोबत नेमकं घडलं काय?

हे प्रकरण प्रतापनगर पोलीस ठाण्याचे असून, एसपी भुवन भूषण यादव यांनी याबाबत रविवारी (21 जानेवारी) खुलासा केला. त्यांनी सांगितले की, केशवनगर रहिवासी राहुलराज चतुर्वेदी याला अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याने भानूप्रिया नावाच्या महिलेची हत्या केल्याचे समोर आले. दोन वर्षांपूर्वी भानुप्रिया त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. चौकशीत त्याने भानू प्रियाची हत्या केल्याची कबुली दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राहुलराज हा पूर्वी राजसमंद राजनगर येथील सत्यनारायण पालीवाल यांच्या घरात भाड्याने राहत होता. 2019 मध्ये झाडोल रहिवासी भानुप्रिया हिचा पती नारायण गिरी गोस्वामीसोबत घटस्फोट झाला. त्यानंतर ती वेगळी झाली आणि राहुलराजसोबत ती लिव्ह इनमध्ये राहू लागली. 12 मे 2020 रोजी दोघांमध्ये खूप भांडण झालं ज्यामुळे राहुलराजने गळा आवळून तिची हत्या केली.

वाचा : PM Modi Speech : “काही लोकं म्हणत होते, राम मंदिर बनलं तर आग लागेल”

क्राईम पेट्रोलिंगचे 1300 भाग पाहून मिळाली आयडिया

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो हनुमान मंदिराचा पुजारी आहे आणि 2019 पासून धामंडी येथे राहणाऱ्या भानुप्रियासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. 2021 मध्ये दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. याचा त्याला इतका राग आला की त्याने भानुप्रियाची हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोलचे अनेक एपिसोड पाहिले, ज्यामध्ये त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची आयडिया घेतली आणि त्यानंतर त्याने भानुप्रियाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

ADVERTISEMENT

हत्येनंतर मृतदेहाची कशी लावली विल्हेवाट?

उदयपूरचे एसपी भुवन भूषण यादव यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपीने त्याची लिव्ह इन पार्टनर भानुप्रियाची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने क्राईम पेट्रोल एपिसोड्सच्या आधारे भानुप्रियाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. हत्येनंतर आरोपीने मृतदेह लोखंडी ड्रममध्ये ठेवला आणि क्राईम पेट्रोलमध्ये सांगितल्याप्रमाणे सिमेंट टाकून पॅक केला.

ADVERTISEMENT

वाचा : PM Modi Speech : “काही लोकं म्हणत होते, राम मंदिर बनलं तर आग लागेल”

मर्डर मिस्ट्रीचा कसा झाला खुलासा?

आरोपीने पुढे सांगितले की, सिमेंट ओतून मृतदेह पॅक केल्यानंतर काही कामानिमित्त तो थोड्यावेळासाठी बाहेर गेला होता, त्यावेळी ड्रमला छिद्र असल्याने खोलीत दुर्गंध पसरली. यामुळे घरमालकाने बोलावून घेतले.

यावेळी त्याने घरमालकाला संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतर आरोपीने घरमालक सत्यनारायण पालीवालसह भानुप्रियाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि नंतर एक-एक करून जाळले. जेव्हा त्याची राख झाली तेव्हा त्याने ती राजसमंदच्या बनास नदीत नेऊन टाकली. आता जेव्हा दोन वर्षानंतर प्रतापनगर पोलीस ठाण्यात आरोपीला शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक केली तेव्हा चौकशीवेळी त्याने हा संपूर्ण प्रकार उघड केला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून आरोपीला अटक केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT