एकाच खोलीत पाच मृतदेह आणि 3 पिस्तुल; कपाळावर गोळ्या लागलेल्या अवस्थेत आढळल्या डेथ बॉडी; संपूर्ण कुटुंब संपलं
Saharanpur Family Murder : उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. अशोक, त्याची पत्नी, आई आणि दोन मुलांच्या कपाळावर गोळ्या लागल्याचे आढळले. घटनास्थळावरून तीन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. अशोकने आत्महत्या करण्यापूर्वी या सर्वांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकाच खोलीत पाच मृतदेह आणि 3 पिस्तूल
कपाळावर गोळ्या लागलेल्या अवस्थेत संपूर्ण कुटुंब संपलं
Saharanpur Family Murder : उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. अशोक, त्याची पत्नी, आई आणि दोन मुलांच्या कपाळावर गोळ्या लागल्याचे आढळले. घटनास्थळावरून तीन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. अशोकने आत्महत्या करण्यापूर्वी या सर्वांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, कर्ज आणि घरगुती तणाव यामुळे अशोकने हे पाऊल उचलले का याचा पोलिस तपास करत आहेत.
हे ही वाचा : डीजीपींचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, आयपीएस अधिकाऱ्यानं दिलं स्पष्टीकरण
कुटुंबियांना संपवलं आणि नंतर केली आत्महत्या
अशोक, त्याची पत्नी अंजिता, त्याची आई विद्यावती आणि त्याची दोन मुलं कार्तिक आणि देव यांचे मृतदेह एका खोलीत आढळले. सर्वांच्या कपाळावर गोळ्या लागल्या होत्या. खोलीतून तीन पिस्तूल सापडल्या. अशोक आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह जमिनीवर आढळला, तर आई आणि दोन मुले बेडवर आढळली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असा संशय आहे की अशोकने आधी आई, पत्नी आणि दोन मुलांवर गोळी झाडून हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली.
का उचलले टोकाचे पाऊल?
सहारनपूर पोलिस कुटुंबातील वादातून रागाच्या भरात गोळीबार झाला का? या शक्यतेचा तपास करत आहेत. बाहेरील व्यक्तीने घरात घुसून हा गुन्हा केला आहे का याचाही ते तपास करत आहेत. कुटुंबातील सदस्यांशी कोणतेही वाद, आर्थिक व्यवहार किंवा वैर आहे का याचाही तपास सुरु आहे.जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात आहेत आणि शेजाऱ्यांची चौकशी केली जात आहे. कुटुंबातील कर्ज, नोकरीशी संबंधित ताण, घरगुती वाद किंवा मानसिक दबाव यामुळे हे भयानक पाऊल उचलले गेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.










