Sangli Crime: बापानेच मुलाचे कटरने केले दोन तुकडे, भयंकर हत्याकांडाची Inside Story

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

The incident of the father killing the son and dismembering the body took place in a village near Miraj in Sangli district due to constant arguments.
The incident of the father killing the son and dismembering the body took place in a village near Miraj in Sangli district due to constant arguments.
social share
google news

Sangli Crime News : एका भयंकर हत्याकांडाने सांगली जिल्हा हादरला. बापानेच पोटच्या मुलाची हत्या केली. मृतदेहाचे दोन तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचा एक भाग तलावात फेकला, तर दुसरा प्लॉटमध्ये ठेवला. मुलाच्या हत्येनंतर बाप पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. ही सगळी घटना ऐकून पोलिसही चक्रावून गेले. (A father killed his son in Miraj taluk of Sangli district.)

रोहित राजेंद्र हांदिफोड (वय 29, रा. गणेश तलाव पाठीमागे, लक्षमी मंदिराजवळ मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून बापाने निम्मा भाग गणेश तलावात फेकून दिला, तर निम्मा भाग सुभाषनगर येथे स्वतःच्या प्लॉटमध्ये ठेवला आहे. या खून प्रकरणानंतर संशयित बाप राजेंद्र याल्लाप्पा हांदिफोड हा स्वतःहून पोलिसात हजर झाल्यानंतर खुनाची ही घटना घडली. मिरज शहरातील सुभाषनगर हंडीफोड मळा येथे उघडकीस आली.

वाचा >> रत्नागिरी : बँकेतून निघाली पण…, आधी गँगरेप नंतर… मृतदेह बघून पोलिसही ‘शॉक’

गणेश तलावामध्ये खून झालेल्या तरुणाचे हात पाय आणि मुंडके फेकून दिल्याची शक्यता आहे. तर उर्वरित धड हे सुभाषनगर येथील हंडीफोड मळ्यात असलेल्या प्लॉटमध्ये ठेवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू आहे. दरम्यान, संबंधित मयत तरुण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बापाने मुलाची हत्या का केली?

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हंडीफोड हा गणेश तलाव पाठीमागे असलेल्या लक्ष्मी मंदिराजवळ राहण्यास होता. त्यांचा वडिलोपार्जित दूध विक्रीचा व्यवसाय होता. अधून मधून तो दूध विक्री हे करायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो कर्जबाजारी झाला. त्यावरून घरात नेहमी वाद घालत असे. यापूर्वी वडिलांसोबत त्याचे भांडण झाले होते. त्यानंतर संबंधित रोहित हांडीफोड याचा खून झाल्याचे उघडकीस आले.

वाचा >> मुख्यमंत्री शिंदेंची शेवटच्या दिवशी फटकेबाजी; उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

वडील राजेंद्र यांनी मुलगा रोहित याच्या डोक्यात फावडा घालून खून केला. त्यानंतर कटरच्या साह्याने हात पाय आणि मुंडके कापून जवळ असलेल्या गणेश तलावात फेकून दिले. त्यानंतर उर्वरित मृतदेहाचे धड एका पोत्यात गुंडाळून सुभाषनगर येथील स्वतःच्या प्लॉटमध्ये आणून फेकले. असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. खून करून संशयित बाप स्वतः पोलिसात हजर झाल्यानंतर खूनाची ही घटना समोर आली आहे. मिरज पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT