“संजय राऊत आणि तुला गोळ्या घालणार, एका महिन्यात स्मशानात पाठवणार”

ADVERTISEMENT

Mumbai Crime News An unknown person has threatened to kill MP Sanjay Raut and MLA Sunil Raut.
Mumbai Crime News An unknown person has threatened to kill MP Sanjay Raut and MLA Sunil Raut.
social share
google news

Sanjay Raut get Death Threats : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना एका महिन्याच्या आत गोळ्या घालणार आणि स्मशानात पाठवणार अशी धमकी देण्यात आली आहे. सुनील राऊत यांना हा धमकीचा कॉल आला असून, या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुनील राऊत यांनी धमकी देणाऱ्याची ऑडिओ क्लिप माध्यमांना दिली असून, धमकी देणारा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहे आणि संजय राऊतांनी सकाळी बोलणं बंद करावं, अशी धमकी देत आहे. (Sanjay Raut, Sunil Raut get death threats)

सुनील राऊत – हॅलो.
धमकी देणारा – हॅलो,
सुनील राऊत – हा
धमकी देणारा – सुनील राऊत बोलताहेत ना?
सुनील राऊत – हा, बोलतोय.
धमकी देणारा – हा, तर तुझ्या भावाला समजव, संजय राऊतला.
सुनील राऊत – कोण माझा भाऊ?
धमकी देणारा – संजय राऊत तुझा भाऊ आहे ना? *** समजव, गोळ्या घालीन ***ला.
सुनील राऊत – तू कुठे गोळ्या मारणार?
धमकी देणारा – जिथे सांगाल, तिथे गोळ्या घालीन.
सुनील राऊत – कुठे, सांग ना? मी त्यांना तिथे पाठवून देतो मारण्यासाठी.

हेही वाचा >> ‘तुमचा दाभोळकर करू’, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

धमकी देणारा – सकाळचा भोंगा बंद करायला सांग.
सुनील राऊत -अरे कुठे पाठवू सांग ना? जिथे गोळ्या घालणार आहेस, तिथे पाठवून देतो +**
धमकी देणारा – त्याला भोंगा बंद करायला सांग ***ला. माझा फोन का घेत नाहीये तो?
सुनील राऊत – अरे, *** कुठे पाठवू ते सांग ना?
धमकी देणारा – अरे, *** माझा कॉल का उचलत नाहीये, ** फाटलीये का?
सुनील राऊत – कुणाची?
धमकी देणारा – संजय राऊतची. त्याला कॉल तर उचलायला सांग.
सुनील राऊत – आ
धमकी देणारा – शपथ घेऊन सांगतो, आता फक्त कॉल केलाय.
सुनील राऊत – संजय राऊत, *** मर्द आहे, समजलं का? तुझ्यासारखा ** नाहीये.
धमकी देणारा – त्याला सकाळचा भोंगा बंद करायला सांग.
सुनील राऊत – चल तुझ्या ***, जे उखडायचं ते उखाड.
धमकी देणारा – मी गोळ्या घालेन.
सुनील राऊत – (हसत) गोळी… कोणती लिमलेटची गोळी मारणार का? कोणती गोळी मारणार?
धमकी देणारा- त्याला समजव, गोळ्या घालेन त्याला.
सुनील राऊत – सोड रे.
धमकी देणारा – तो माझा कॉल का घेत नाहीये?
सुनील राऊत – सोड रे.
धमकी देणारा – सोड रे काय… त्याला माझा कॉल उचलायला सांग नाहीतर गोळ्या घालेन. एका महिन्यात दोन्ही भावांना गोळ्या घालणार.
सुनील राऊत – कुठे गोळ्या घालणार? आम्ही दोघंही तिथे येतो.
धमकी देणारा – दोन्ही भावांना स्मशानात पाठवेन.
सुनील राऊत – *** ठिके. मार. मार आम्हाला.
धमकी देणारा – सकाळचा भोंगा बंद करायला सांग, त्याला.
सुनील राऊत – हा, मार मार.
धमकी देणारा – एका महिन्याच्या आत दोन्ही भावांना स्मशानात पाठवणार.
सुनील राऊत – ठिके. सोड रे ***
धमकी देणारा – एका महिन्यात दोघांना स्मशानात पाठणार.
सुनील राऊत – हा, बघतो मी. तू खुशीत रहा.
धमकी देणारा – कोणत्या गोष्टीमुळे तू इतका उडतोय?
सुनील राऊत – तुझ्यावर, बोल काय करायचं आहे?
धमकी देणारा – गोळ्या घालेन गोळ्या. समजलं का?
सुनील राऊत – अरे पन्नास वेळा तुला सांगितलंय की मारून दाखव दोन्ही भावांना.
धमकी देणारा – ठिके. दाखवतो मी तुम्हा दोन्ही भावांना गोळ्या घालून.
सुनील राऊत – ठिके. दाखव. चल आता फोन ठेव.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT