नागपूर : लेस्बियन विद्यार्थीनीची आत्महत्या, कारण…; सुसाईड नोटमध्ये काय?
नागपूरमध्ये समलैंगिकतेच्या तणावातून एका लेस्बियन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती…
ADVERTISEMENT
समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर हा मुद्दा देशभरात चर्चिला जात आहे. असं असतानाच नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहरातील एका 18 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांचा विरोध असल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं. (lesbian girl committed suicide in nagpur)
ADVERTISEMENT
मयत विद्यार्थीनी ही नागपूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाच्या (बीए) दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती शहरातील काटोल रोड परिसरात कुटुंबीयासोबत राहत होती. मयत विद्यार्थीनीचे वडील हे सरकारी कर्मचारी असून, ते मूळचे उत्तर भारतातील आहेत. आई-वडील, लहान भाऊ आणि ती असं त्यांचं कुटुंब नागपूरमध्ये वास्तव्यास आहे.
लेस्बियन विद्यार्थीनीने आत्महत्या का केली?
मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेली विद्यार्थी लेस्बियन होती. तिला ही गोष्ट जाणवल्यानंतर तिने ही बाब आई वडिलांना सांगितली. तिच्याबद्दल ही बाब कळल्यानंतर कुटुंबीयांनाही धक्का बसला. त्यांनी या गोष्टीला विरोध केला. लेस्बियन असल्याची माहिती कळल्यापासून तिच्या कुटुंबात तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे ती नैराश्यात होती.
हे वाचलं का?
हेही वाचा >> शेजाऱ्याकडून बायको राहिली गर्भवती; पतीने केलेलं कृत्य ऐकून पोलिसही झाले सुन्न
दरम्यान, कुटुंबातून होत असलेल्या विरोधामुळे ती तणावग्रस्त झाली होती. त्यातूनच रविवारी दुपारी तिचे आई-वडील व भाऊ बाहेर गेले असताना तिने घरातील सीलिंग फॅनला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
हेही वाचा >> धीरेंद्र आचार्याच्या शिष्याचा प्रताप! कथेचं आयोजन करणाऱ्याच्या पत्नीलाच पळवलं
आई वडील आणि भाऊ घरी आले. त्यांना ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि तातडीने तिला नागपुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
ADVERTISEMENT
सुसाईड नोटमध्ये काय?
संबंधित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. घटना घडल्यानंतर पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांच्या हाती ही सुसाईड नोट आढळली. मुलीने लिहिलेल्या सुसाईड नोट नुसार तिचे आई-वडील लग्नासाठी मुलगा शोधत होते मात्र तिचा कल समलैंगिकतेकडे असल्यामुळे त्या मुलाशी नीट संसार करता आला नसता व तो देखील कधी सुखी झाला नसता असे तिने लिहिले आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणी नागपुरातील गिट्ठीखदान पोलिसांनी आत्महत्या आणि आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT