Aurangabad Lok Sabha : शिंदे-ठाकरेंच्या जीवाला घोर; 'हा' फॅक्टर ठरवणार औरंगाबादचा खासदार!

ADVERTISEMENT

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे.
social share
google news

Aurangabad Lok Sabha election 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आपापल्या उमेदवारांची घोषणा केली. महायुतीत याबद्दल बराच खल चालू होता, अखेर संदीपान भुमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. पण, यामुळे विनोद पाटील यांचा महायुतीकडून लढण्याचा मार्ग बंद झाला. असं असलं तरी विनोद पाटलांनी अजूनही तलवार म्यान केलेली नाही. त्यामुळेच शिंदे आणि ठाकरेंचं टेन्शन वाढणार आहे. (Aurangabad Lok Sabha election 2024 Latest News)

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली. एकनाथ शिंदे यांनीही कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. 

संदीपान भुमरे यांच्याबरोबरच मराठा आरक्षणाची लढाई लढत असलेले विनोदी पाटील हेही लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी ते महायुतीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण, शिंदेंनी भुमरेंवर विश्वास टाकला. असं असलं तरी पाटील माघार घ्यायला तयार नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विनोद पाटील अपक्ष लढवणार लोकसभा निवडणूक

शिंदेंच्या शिवसेनेने तिकीट न दिल्याने पाटील नाराज झाले, पण ते निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. ते काय म्हणाले, ते वाचा...

"छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी लढण्यास इच्छुक आहे. परवा महायुतीकडून संदिपान भुमरे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची इच्छा होती की, त्या ठिकाणी मला उमेदवारी देण्यात यावी", असे विनोद पाटील म्हणाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> नामांतर होऊनही निवडणूक आयोग औरंगाबाद आणि उस्मानाबाद नाव का वापरतोय?

"महायुतीमधील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांचा माझ्या उमेदवारीला विरोध होता. या निर्णयावर पुनर्विचार होईल अशी मला अजूनही अपेक्षा आहे. मतदारसंघाची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचं गणित आहे, ती चर्चा करण्यासाठी मी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलो होतो", असे विनोद पाटील यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

"आश्वासन मिळावं यासाठी भेट नव्हती, तर मतदारसंघाची काय स्थिती आहे; यासाठी पुन्हा एकदा ती तपासली गेली पाहिजे यासाठी भेट होती. मला महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर मी ही जागा लढणार आणि नाही मिळाली तरीही मी ताकदीने ही निवडणूक लढविणार आहे", असे विनोद पाटील म्हणाले.

हेही वाचा >> "चहाच्या टपरीवर असताना उद्धव ठाकरेंनी दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर" 

"या जागेवर मी इच्छुक आहे त्यामुळे आता महायुतीने ते ठरवायचं आहे. आजची चर्चा सकारात्मक झाली", असे ते म्हणाले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत?

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत. गेल्यावेळी या मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती, पण यावेळी पाच उमेदवार रिंगणात असतील असे दिसत आहे. 

गेल्या वेळी जवळपास पावणे तीन लाख मते घेणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याचबरोबर विद्ममान खासदार इम्तियाज जलील हेही पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे निवडणूक लढवताहेत. त्यात आता विनोद पाटलांनी अर्ज भरला, तर याचा फटका ठाकरे किंवा शिंदेंच्या उमेदवाराला बसणार, अशीच स्थिती दिसत आहे. 

कोणता फॅक्टर आहे निर्णायक?

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे पक्षांकडून मांडले जात आहेत. यात राम मंदिर, मोदी आणि इतर मुद्दे सत्ताधाऱ्यांकडून मांडले जात आहे. विरोधकांकडूनही महागाई, बेरोजगारी, जातीय धुव्रीकरण, संविधान बदल आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचे प्रयत्न होताहेत.

हेही वाचा >> मिलिंद नार्वेकरांना लोकसभा लढवण्याची ऑफर दिलीये का? शिंदे म्हणाले... 

या सगळ्यात एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे मराठा आंदोलन. मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन उभं राहिलं त्याचा केंद्रबिंदूच बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात राहिला आहे. जरांगे ज्या अंतरवाली सराटीत आंदोलनाला बसलेले, ते छत्रपती संभाजीनगरपासून काही अंतरावरच आहे. त्यामुळे याचा प्रभाव या मतदारसंघात जास्त आहे.

हेही वाचा >> "काँग्रेसची नजर आता माता भगिनींच्या मंगळसूत्रावर", मोदींवर गांधींसह विरोधक संतापले 

गेल्या वेळी हर्षवर्धन जाधव यांच्या बाजूला मराठा मतदार वळला आणि चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याचा थेट फायदा इम्तियाज जलील यांना झाला. त्यामुळेच या निवडणुकीत मराठा फॅक्टर गेमचेंजर ठरणार, हे स्पष्ट दिसत आहे. अशात विनोद पाटील हे रिंगणात असतील, तर भुमरे, खैरे, जाधव आणि पाटील यांच्यात मतदान विखुरले जाईल आणि याचा फायदा पुन्हा एकदा जलील यांना होऊ शकतो. 

मुस्लीम मतदारांचं प्रमाण किती?

मराठवाड्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतांची संख्या जास्त आहे. जवळपास 21 ते 22 टक्के इतकी आहे. अनुसूचित जाती-जमातीची संख्या 19 ते 20 टक्के आहे. वंचित यावेळी एमआयएमसोबत नाही. पण, ओवेसींनी प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा दिला आहे. त्याचा फायदा त्यांना औरंगाबादमध्ये होऊ शकतो. त्यामुळे पाटलांच्या एन्ट्रीने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा घोर वाढणार असे दिसत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT