Baba Ramdev : बाबा रामदेव यांना 'सुप्रीम' झटका! द्यावा लागणार सर्व्हिस टॅक्स
Baba Ramdev Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने योग शिबिरे आयोजित करणाऱ्या बाबा रामदेव यांना मोठा झटका दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टात पुन्हा झटका

योग शिबिरांसाठी द्यावा लागणार सेवा कर

सर्वोच्च न्यायालयाने आदेशात काय म्हटले?
Baba Ramdev News : (संजय शर्मा, दिल्ली) योगगुरू स्वामी रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. आता त्यांची योग शिबिरे सेवा कराच्या कक्षेत आली आहेत. स्वामी रामदेव यांच्या योग शिबिरांचे आयोजन करणाऱ्या 'पतंजली योगपीठ ट्रस्ट'ला आता सेवा कर भरावा लागणार आहे. (Baba Ramdev gets big blow from Supreme court, now he will have to pay service tax for yoga camp)
न्यायमूर्ती अभय एम. ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यासंदर्भात सेवा कर अपिलीय न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला आहे.
सेवा कर अपिलीय न्यायाधिकरणाने आपल्या निर्णयात पतंजली योगपीठ ट्रस्टला निवासी आणि अनिवासी अशा दोन्ही प्रकारच्या योग शिबिरांचे आयोजन करण्यासाठी सेवा कर भरणे बंधनकारक केले होते.
बाबा रामदेव यांच्या योग शिबिरांना सेवा कर
पतंजली योगपीठ ट्रस्ट स्वामी रामदेव यांच्या योग शिबिरांसाठी प्रवेश शुल्क आकारते. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती भुईया यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले की, 'सेवा कर अपिलीय न्यायाधिकरणाने ते योग्यच म्हटले आहे. प्रवेश शुल्क आकारल्यानंतर शिबिरांमध्ये योग ही सेवा आहे."