पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची मूड, नंतर इस्त्रीचे चटकेही.. हैवान पतीला होता फक्त 'हा' संशय

मुंबई तक

Husband-Wife Crime News: पत्नीचे परपुरुषासोबत अफेअर असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत अत्यंत अमानुष कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

पतीचे पत्नीवर अमानुष अत्याचार (फोटो सौजन्य: Grok)
पतीचे पत्नीवर अमानुष अत्याचार (फोटो सौजन्य: Grok)
social share
google news

मुझफ्फरपूर: बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात माणुसकीला लाज आणणारा एक प्रकार उघडकीस आला आहे. जिथे एका पतीने परपुरूषासोबत पत्नीचे शारीरिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या पत्नी अत्यंत क्रूरपणे अत्याचार केले. ज्याबाबत ऐकून तुमचाही थरकाप होईल. ही घटना 13 जून रोजी घडली, जेव्हा आरोपी पतीने आपल्या पत्नीला मारहाण केल्यानंतर तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली आणि नंतर तिच्या गुप्तांगाला थेट इस्त्रीने चटके दिले.

पीडितेचा आरोप आहे की, ती वेदनेने तडफडत होती, परंतु पतीचा क्रूरपणा कमी झाला नाही. नराधम पती हा एवढ्यावरच थांबला नाही तर तो तिला विजेचा झटका देण्याचा प्रयत्नही करत होता. हा सगळा अत्याचार इथेच थांबला नाही तर पत्नीला दोन दिवस उपाशी आणि बिनापाण्याचंही ठेवलं. तसंच तिचे हातपाय बांधून तिला एका बंद खोलीत कोंडून ठेवलं. या काळात तिला ना उपचार मिळाले ना काही अन्न-पाणी.

हे ही वाचा>> महिला हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेली रंगात, पतीची अचानक एंट्री.. थेट छातावरून मारली उडी

माहेरच्या लोकांनी वाचवला जीव

पीडितेने सांगितले की, तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकूनही आजूबाजूचे लोक गप्प राहिले, कारण ते सर्वजण घाबरले होते. अखेर 15 जून रोजी पीडित महिलेचा भाऊ तिच्या घरी आला तेव्हा त्याला सगळा प्रकार समजला. ज्यानंतर त्याने आपल्या बहिणीची सुटका करून तिचा जीव वाचला. तिला गंभीर अवस्थेत त्याने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं, तेथून डॉक्टरांनी तिला  एसकेएमसीएचला (SKMCH) रेफर केले.

एफआयआरमध्ये चार आरोपी, पती अटक

16 जून रोजी पीडितेने पारू पोलीस ठाण्यात तिचा पती शत्रुघ्न राय (वय 40 वर्ष), सासू दुखनी देवी, दीर सुमेश राय आणि भावजय पुष्पा देवी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. ज्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक करून तुरुंगात पाठवले, तर इतर तीन आरोपी हे फरार झाले आहेत.

हे ही वाचा>> महिलेनं आधी नवऱ्याला सोडलं, नंतर दुसरा धरला अन् थेट मुलालाच...आई नाही ही तर कसाई

पोलीस स्टेशनचे प्रभारी राम विनय कुमार यांनी आज तकला सांगितले की, "हे प्रकरण खूप गंभीर आहे. एफआयआरमध्ये महिलांवरील हिंसाचार आणि शारीरिक छळाचे कठोर कलम लावण्यात आले आहेत. इतर आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत."

'मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती'

पीडितेने आज तकला तिच्या अत्याचाराबद्दल सांगितले की, "माझे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले आणि मला तीन मुले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून माझे पती आणि त्याचे कुटुंबीय माझ्यावर संशय घेत होते. जेव्हा मी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करा असं सांगितलं तेव्हा त्या लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत जे काही केलं ते एखादा प्राणीही करणार नाही."

हे वाचलं का?

    follow whatsapp