राजा रघुवंशीच्या हत्येच्या काही मिनिटांआधीचा Video आला समोर, सोनमच्या हातात काय होतं?

मुंबई तक

Opreation Honeymoon: पत्नी सोनमने पती राजा रघुवंशी याची हत्या करण्याआधीचा एक नवा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. जाणून घ्या या व्हिडिओमधून नेमकी कोणती माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

राजा रघुवंशीच्या हत्येच्या काही मिनिटांआधीचा Video (फोटो: Video Grab)
राजा रघुवंशीच्या हत्येच्या काही मिनिटांआधीचा Video (फोटो: Video Grab)
social share
google news

Raja Raghuwanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्याकांडात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ हत्येच्या काही तासांपूर्वीचा आहे, ज्यामध्ये राजा आणि त्याची पत्नी सोनम मेघालयातील घनदाट जंगलात ट्रेकिंग करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सोनम हातात काठी घेऊन पुढे चालत आहे आणि राजा तिच्या मागे चालताना दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ तपासाला एक नवी दिशा मिळाली आहे.

ट्रॅकिंग की हत्येसाठी रेकी?

23 मे रोजी सकाळी 9.45 वाजताचा हा व्हिडिओ 'डबल डेकर रूट ब्रिज'जवळ रेकॉर्ड करण्यात आला होता. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता राजाची हत्या करण्यात आलेली. सोनम तिच्या पतीला त्याच जंगलात घेऊन जात होती जिथे मारेकरी आधीच लपले होते? असा सवाल आता विचारला जात आहे.

हे ही वाचा>> दुप्पट वयाच्या पतीसोबत नव्हते ठेवायचे शारीरिक संबंध फक्त हवी होती 'ही' गोष्ट.. सांगलीतील पतीच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओमधील सोनमचे कपडे मिळतेजुळते? 

व्हायरल व्हिडिओमध्ये सोनम पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. २२ मे रोजी हॉटेलबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही सोनम याच कपड्यांमध्ये दिसून आली होती. याचा अर्थ व्हिडिओमध्ये दिसणारी महिला सोनम आहे, यात काही शंका नाही. अशा परिस्थितीत, आता पोलीस सोनम आणि राजा कुठे जात होते आणि का जात होते हे शोधण्यासाठी या नव्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या परिसराचा देखील मागोवा घेत आहेत

सोनमचे ठरवला होता ट्रेकिंगचा मार्ग?

देव सिंग नावाच्या एका पर्यटक फोटोग्राफरने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याने लिहिले की, हे जोडपं खाली येत असताना त्याला भेटलं होतं. म्हणजेच सोनम आणि राजा ट्रेकिंगवरून परतत होते, पण जर ते परतत असतील तर दुपारी अचानक राजा कुठे आणि कसा गायब झाला? या ट्रेकिंग मार्गावर कोणी त्याचा घात करण्यासाठी वाट पाहत होते का?

हे वाचलं का?

    follow whatsapp