वाढदिवस साजरा करण्यासाठी टोळक्यानं पुरूषाचा केला खून, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Ahilyanagar Crime News : काही तरुणांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट एका निष्पाप पुरूषाचा खून केला आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे 8 जून रोजी घटना घडली आहे. 

ADVERTISEMENT

Ahilyanagar Crime News
Ahilyanagar Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाढदिवस साजरा करण्यासाठी पुरूषाचा खून

point

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील घटना

Ahilyanagar Crime News : लोक आपला वाढदिवस विविध पद्धतीने साजरा करतात. तर काहीजण सामाजिक बांधिलकी जोपासतात. तर काहीजण मदतकार्य करत असतात. त्याचप्रमाणे काही लोक केक कापून वाढदिवस साजरा करू लागतात. पण वाढदिवसासाठी कधी कोणी खून केल्याचं ऐकलं नसेलच. पण काही तरुणांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट एका निष्पाप पुरूषाचा खून केला आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे 8 जून रोजी घटना घडली आहे. 

हेही वाचा : ऑनलाईन रम्मीचा नाद लय बेकार, विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला पाजलं विष अन्...

12 जून रोजी पुरूषाचा मृतदेह हा कोपरगावातच आढळला आहे. 8 जून रोजी कोपरगाव तालुक्यातील गणेश चतर वय वर्षे 42 असे खून केलेल्या पुरूषाचे नाव आहे. गणेश हा शिर्डीतील नांदुर्खी येथील परिसरात कामानिमित्त आले होते. मात्र, 12 जूनला त्यांचा मृतदेह एका शेतात आढळून आला होता. विशेष म्हणजे वाढदिवशीच गणेशचं अपहरण करत त्याला लुटण्यात आलं आणि नंतर मारहाण करण्यात आली. यात गणेश चतुरचा जीव गेला आहे. संबंधित प्रकरणाचा पोलस आता तपास करत आहेत. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक कारण समोर आलं. या हत्याप्रकरणातील 7 पैकी 6 आरोपी अल्पवयीन आहेत.

धक्कादायक कारण समोर 

12 जून रोजी शिर्डीजवळ असणाऱ्या नांदुर्खीच्या शिवारात एका शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हा स्थानिकांना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृत्यू झालेल्या मृतदेहाची नोंद करण्यात आली. मृतदेह कुजल्याने पोलिसांना याचा तपास करणं आव्हानात्मक होतं. 

अशावेळी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असता, कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या घटनेची एकूण माहिती जाणून घेत प्रकरण हाताळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मृत व्यक्तीच्या मोबाईलचा सीडीआर आणि कुटुंबीयांकडून केलेल्या चौकशीतून ही घटना समोर आली आहे. राहता तालुक्यात वाढदिवशी तरुणाला लुटून पार्टी करता येईल या उद्देशाने राहता तालुक्यातील 7 जणांनी मिळून या व्यक्तीचा खून केल्याचं पोलिसांनी तपासातून निष्पन्न केलेलं आहे. 

हेही वाचा : पतीने दिली समोशाची ऑर्डर, पत्नी वॉशरूमधूनच झाली गायब.. लग्नाच्या 10 व्या दिवशीच काय घडलं?

दरम्यान, गणेश हे 8 तारखेला लग्न कार्याला गेले होते. मात्र, त्यानंतर ते पुन्हा परतलेच नाही. मारहाण करणारे अल्पवयीन मुलं असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या अल्पवयीन मुलांमागे कोणी सूत्रधार आहे का? असा प्रस्न उपस्थित होत आहे. अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्हासाठी मोठी कारवाई केली जात नाही. पण या अल्पवयीन मुलांना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गणेश चतर यांच्या मामाने केली आहे. 


हे वाचलं का?

    follow whatsapp