महाराष्ट्रातील सोनमचा ‘दृश्यम’ पेक्षा खतरनाक प्लॅन; 2 महिन्यानंतर मिळाला पतीचा मृतदेह...

मुंबई तक

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात एका पत्नीने तिच्याच पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घराजवळील नाल्यात पुरल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे.

ADVERTISEMENT

नाशिकमध्ये पत्नीने पतीची केली हत्या...2 महिन्यानंतर मिळाला पतीचा मृतदेह
नाशिकमध्ये पत्नीने पतीची केली हत्या...2 महिन्यानंतर मिळाला पतीचा मृतदेह
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक जिल्ह्यात पत्नीने पतीची हत्या केल्याचा भयानक प्रकार

point

हत्या करुन मृतदेह नाल्यात पुरला

point

पतीच्या हत्येनंतर चौकशीत पत्नीची कबुली

Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील मालगोंडा या छोट्याशा गावात एक हृदयद्रावक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. इथे एका पत्नीने तिच्याच पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घराजवळील नाल्यात पुरला. या भयानक प्रकाराने संपूर्ण परिसर हादरूला आहे. यशवंत ठाकरे अशी मृत व्यक्तीची ओळख झाली असून तो 14 एप्रिलपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

दोन महिन्यांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचं गूढ उघडकीस आणलं आणि या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला. 
दोन महिने उलटून गेल्यावर सुद्धा यशवंत घरी परतले नव्हते आणि त्यावेळी याबद्दल त्यांच्या आई-वडिलांना त्यांची काळजी वाटत होती. या काळजीपोटी त्यांनी त्यांची सून प्रभाला विचारलं. त्यावेळी यशवंत कामानिमित्त गुजरातला गेले असल्याचं प्रभाने सांगितलं. त्यानंतर कुटुंबातील सदस्य यशवंतचा शोध घेण्यासाठी गुजरातला गेले आणि तिथल्या चौकशीनंतर यशवंत तिथे कधीच गेला नसल्याचं नातेवाईकांना सांगितलं. यामुळे संशय आणखी वाढला. कुटुंबिय सतत प्रभाला याबद्दल विचारत होते मात्र त्यावेळी प्रभा उत्तर देण्यास टाळाटाळ करायची किंवा अस्पष्ट उत्तर द्यायची.


 

पोलिसांच्या चौकशीत सत्य आलं समोर

 

कुटुंबियांच्या तक्रारीनंतर प्रभाला ताब्यात घेण्यात आलं आणि तिची कसून चौकशी केली. सुरुवातीला तिने काही गोष्टी खोट्या सांगितल्या. पण जेव्हा पोलिसांनी तिला गावाचा नकाशा दाखवून तिला त्यावर प्रश्न विचारले तेव्हा प्रभा अखेर रडली. तिने कबूल केले की तिने तिच्या पतीची कुऱ्हाडीने हत्या केली आणि घराजवळ खड्डा खोदून मृतदेह पुरला.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp