गर्लफ्रेंडला रात्री कोणासोबत थांबणार यावरून बॉयफ्रेंड आणि मित्रात वाद, मध्यरात्री नको ते घडलं!
पोलिसांच्या तपासातून असं समोर आलं की, अमनचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. अमन आणि त्याचा मित्र यांनी मिळून त्या तरुणीला गावातून मोटरसायकलवर घेऊन आले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास संकेत-गाजीपूर परिसरात त्यांची मोटरसायकल खराब झाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेयसिला पळवून घेऊन निघाले, रस्त्यातच गेम झाला

गाडी खराब झाल्यानंतर प्रियकर दोघांना सोबत सोडून गेला

नंतर प्रियकराचा मृतदेहच आढळला
Crime News : गेल्या काही दिवसांमध्ये देशात अनेक खळबळजनक गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता मथुरा येथील बरसाना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या एका तरुणाच्या मृतदेह प्रकरणाचा खुलासा केला आहे. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृत तरूणाची प्रेयसी आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. मृताचं नाव अमन असून, तो हरियाणातील तावडू-नूंहचा रहिवासी होता.
शेतात सापडला होता मृतदेह
दोन दिवसांपूर्वी बरसाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाजीपुर आणि संकेत गावांदरम्यान राजा यांच्या शेतात एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख अमन अशी झाली. पोस्टमॉर्टम अहवालात तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं. यानंतर बरसाना पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकमल बालियान यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली.
हे ही वाचा >> गर्भवतीला रुग्णवाहिका न मिळाल्यानं बाळ गेलं, शेवटी बाळाचा मृतदेहही बॅगेतच घरी आणला, घटना काय?
प्रेयसीला घेऊन निघाले, पण रस्त्यातच...
पोलिसांच्या तपासातून असं समोर आलं की, अमनचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. अमन आणि त्याचा मित्र यांनी मिळून त्या तरुणीला गावातून मोटरसायकलवर घेऊन आले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास संकेत-गाजीपूर परिसरात त्यांची मोटरसायकल खराब झाली. यानंतर तरुणीला कुठं ठेवायचं यावरून तिघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, अमनने प्रेमिका आणि मित्राला "मी आता येतो" असं सांगून तिथून निघून गेला. त्यानंतर तो शेतात गेला आणि एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
पोलिसांच्या तपासात असं आढळलं की, अमनवर आत्महत्येसाठी दबाव टाकण्यात आला होता. या प्रकरणात मृत तरूणाची प्रेमिका आणि त्याच्या मित्राने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. सध्या या दोघांची कसून चौकशी सुरू आहे, आणि पोलिस या प्रकरणातील इतर बारकावे शोधण्यात गुंतले आहेत.
हे ही वाचा >> मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया विमानात बिघाड, डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर कोलकातामध्येच...
बरसाना पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकमल बालियान यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसंच, नागरिकांना कोणत्याही तणावपूर्ण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याचे आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रेमसंबंध आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितींवर चर्चा सुरू झाली आहे.