Khan Mubarak: क्रिकेट मॅचमध्ये अंपायरला गोळ्या घालणाऱ्या छोटा राजनच्या खास शूटरचा मृत्यू
Khan Mubarak Death: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा शार्प शूटर खान मुबारक याचा तुरुंगातच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या कोण आहे खान मुबारक.
ADVERTISEMENT
Khan Mubarak Died: लखनऊ: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) टोळीचा शार्प शूटर खान मुबारक (Don Khan Mubarak) याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मुबारक खानला उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हरदोई जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. आता असा दावा करण्यात येत आहे की, आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. खान मुबारकला जुलै 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. ही अटक यूपी एसटीएफने (UP STF) केली होती. त्याला लखनऊच्या पीजीआय परिसरात अटक करण्यात आली होती. खान मुबारकवर खून, अपहरणासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो छोटा राजनचा खास टोळीचा सदस्य होता. 6 मार्च 2020 रोजी लखनौ तुरुंगातून हरदोई कारागृहात त्याला हलवण्यात आलं होतं. यामागे प्रशासकीय कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. (underworld don chhota rajan gang sharp shooter khan mubarak death jail uttar pradesh mumbai)
ADVERTISEMENT
अलाहाबाद विद्यापीठात होता विद्यार्थी नेता, तिथेची केली पहिली हत्या
खान मुबारक हा मूळचा यूपीतील आंबेडकरनगरचा रहिवासी होता. अलाहाबाद विद्यापीठात तो विद्यार्थी नेता देखील होती. पण इथेच त्याने पहिली हत्या केल्याचे सांगितले जाते. या हत्याकांडानंतरच तो मुंबईत त्याचा भाऊ जफर सुपारी याच्याकडे गेला होता. हा तोच जफर सुपारी होता जो मुंबईचा डॉन छोटा राजनचा अगदी खास माणूस होता. आपल्या याच भावाच्या माध्यमातूनच खान मुबारकरची छोटा राजनशी भेट झाली होती. मग हळूहळू खान मुबारक हा छोटा राजनचा अगदी मर्जीतील माणूस बनला होता. छोटा राजनच्या सांगण्यावरून त्याने खून आणि खंडणी उकळण्याचं काम सुरू केलं होतं. त्यामुळे तो सुपारी किलर ठरला होता.
हे ही वाचा >> Mumbai :आर्थर रोड जेल हादरला! दोन कैद्यांकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार
न्यूमोनियामुळे खान मुबारकचा मृत्यू?
खान मुबारक गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत होतं. त्याच्यावर जिल्हा कारागृह रुग्णालयातच उपचार देखील सुरू होते. मात्र, आता त्याचा मृत्यू झाल्याने छोटा राजन टोळीला मोठा धक्का बसला आहे. डेप्युटी सीएमओ डॉ. पंकज मिश्रा यांनी माध्यमांना सांगितले की, खान मुबारक याचा मृत्यू न्यूमोनियाच्या संसर्गामुळे झाला.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Park Soo Ryun: पायऱ्यांवरून पडून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, पण तिचं हृदय कायम..
खान मुबारकने क्रिकेट मॅचमध्ये अंपायरवर झाडलेली गोळी
दरम्यान, खान मुबारक हा एका वेगळ्याच कारणामुळे खरं तर चर्चेत आला होता. एका क्रिकेट सामन्यादरम्यान अंपायरच्या निर्णयामुळे खान मुबारक संतापला होता. ज्यानंतर त्याने चक्क अंपायरवरच गोळी झाडली होती. या भयंकर घटनेनंतर तो प्रचंड चर्चेत आला होता. याशिवाय 2006 मध्ये मुंबईतील काळा घोडा घटनेमुळेही तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT