आजीसोबत देवळात आरतीला गेली, रात्री देवळातच रक्तबंबाळ अवस्थेत सापडली; तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत काय झालं?
Crime News : तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी (24 मार्च) रात्री घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळीमा फासला असून, गंभीर जखमी झालेल्या बालिकेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आजीसोबत देवळात आरतीला गेली
शेवटी देवळातच रक्तबंबाळ अवस्थेत सापडली
तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत काय झालं?
Crime News : तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी (24 मार्च) रात्री घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळीमा फासला असून, गंभीर जखमी झालेल्या बालिकेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. बिहारच्या भदौर परिसरातील ही घटना आहे.
आरती करत असताना मुलगी बेपत्ता
मंगळवारी संध्याकाळी ही चिमुरडी आपल्या आजीसोबत गावातील दुर्गा मंदिरात आरतीसाठी गेली होती. आरती सुरू असताना आजीने तिला खाली उभे केले आणि त्या आरतीत मग्न झाल्या. मात्र, आरती संपल्यानंतर जेव्हा आजीने तिचा शोध घेतला, तेव्हा ती तिथे नव्हती. बराच वेळ शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने हताश होऊन आजीने घरी धाव घेतली आणि कुटुंबीयांना याची माहिती दिली.
हे ही वाचा : कल्याण : सायकलिंग करत असलेल्या बिझनेसमनला चिरडलं, अल्पवयीन मुलाची बेदरकार कार ड्रायव्हिंग; पाहा VIDEO
मंदिराच्या परिसरात जखमी अवस्थेत
मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास ही चिमुरडी रक्ताने माखलेल्या अवस्थेत पुन्हा मंदिर परिसरात दिसून आली. तिची अवस्था पाहून स्थानिक नागरिक हादरून गेले. बालिकेच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती. नागरिकांनी तातडीने तिच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना पाचारण केले. बालिकेची गंभीर प्रकृती पाहता तिला प्राथमिक उपचारानंतर तातडीने पाटणा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.









