मोबाईल घेताच निवृत्त IAS अधिकाऱ्याने लगावली कानाखाली, कुत्र्यामुळे तुंबळ हाणामारी

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Uttar Pradesh Noida Crime News Argument over a dog in lift between Retired IAS and the couple clash captured in cctv
Uttar Pradesh Noida Crime News Argument over a dog in lift between Retired IAS and the couple clash captured in cctv
social share
google news

Uttar Pradesh Noida Crime News : उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका पॉश सोसायटीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याला नेण्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यावेळी निवृत्त आयएएस आणि एका दाम्पत्यामध्ये हाणामारी झाली. या वादाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकारी यांच्यात झालेली हाणामारी दिसत आहे.

त्यानंतर काही वेळाने महिलेचा पतीही तेथे आला आणि तो निवृत्त आयएएस आरपी गुप्ता यांना मारहाण करताना दिसला. सेक्टर-108 येथील पार्क्स लॉरेट सोसायटीत ही घटना घडली. मात्र, या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांची समजूत काढली आणि शांत झाले.

वाचा: Maratha Reservation : आरक्षणासाठी कराव्या लागतील ‘या’ गोष्टी, भोसले समिती अहवालात काय?

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला कुत्र्याला लिफ्टमध्ये सोबत घेऊन जायचे होते. मात्र निवृत्त आयएएस अधिकारी त्याला विरोध करत होते. त्यांनी तिला कुत्रा नेण्यास मनाई केली. यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू झाला. वाद सुरू असताना आयएएस अधिकाऱ्याने त्याचा मोबाइल काढताच महिलेने तो त्याच्याकडून हिसकावून घेतला. यानंतर वाद वाढत गेला आणि निवृत्त आयएएसने महिलेला कानाखाली मारली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे वाद आणखी वाढला. शेजारी इतर लोकही जमले. त्यानंतर त्या महिलेचा नवराही तेथे आला. त्यानंतर महिलेने पतीसह निवृत्त आयएएसला कानाखाली मारण्यास सुरुवात केली.

वाचा: Maratha Reservation: महाराष्ट्र पेटला! आरक्षणासाठी थेट आमदारांची घरं, ऑफिसं जाळली?

घटनेची माहिती मिळताच कोतवाली सेक्टर-39 चे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. सोसायटीत लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झालेली दिसली. मात्र, याप्रकरणी दोन्ही पक्षांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यांनी आपापसात प्रकरण मिटवले.

ADVERTISEMENT

वाचा: नववधू हादरली… Honeymoon च्या रात्री व्हायग्रा घेऊन पतीकडून अनैसर्गिक संबंध

नोएडातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये अशी प्रकरणे अनेकदा पाहायला मिळतात. यापूर्वी गौर शहरातील सातव्या अ‍ॅव्हेन्यूमधूनही असेच प्रकरण समोर आले होते. यावेळीही एक तरुण त्याच्या कुत्र्याला लिफ्टमधून आणत होता. पण लिफ्टमध्ये आधीच असलेले एक मूल रडायला लागले. त्याला कुत्र्याची भीती वाटत होती. छोट्या मुलाच्या आईने त्या तरूणाला दुसऱ्या लिफ्टने येण्यास सांगितले तेव्हा त्या तरुणाने तिच्याशी वाद घातला. गार्डने अडवणूक केल्यावर त्यानेही त्याच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर एका दुसऱ्या महिलेने त्याला अडवून त्याचा व्हिडीओ बनवल्याचे सांगताच तो तरुण तेथून निघून गेला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT