डान्स करत तरुणी झाली विवस्त्र, भंडाऱ्यातील ‘त्या’ व्हिडीओमुळे उडाली खळबळ…

ADVERTISEMENT

Video of obscene dance in Bhandara district goes viral two policemen suspended
Video of obscene dance in Bhandara district goes viral two policemen suspended
social share
google news

Bhandara Crime : भंडारा जिल्ह्यातील आयोजित एका कार्यक्रमात महिला आणि इतर काही जणांनी अश्लील नृत्य (obscene dance) केले होते. त्याचा कार्यक्रमाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Video Viral) झाला आहे. अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी बुधवारी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमस्थळी पोलिसच गैरहजर

सध्या ज्या व्हिडीओची जोरदार चर्चा केली जात आहे, ती घटना 17 नोव्हेंबरच्या रात्री घडली होती. त्यादिवशी भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरीमध्ये जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. जत्रेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल आणि एका हवालदाराला ठेवण्यात आले होते. मात्र त्यावेळी ते तिथे गैरहजर राहिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाकाडोंगरीमध्ये 17 नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर यांनाही या प्रकरणी नोटीस देण्यात आले आहे.

हे ही वाचा >> IPL Auction 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा 2 भारतीय क्रिकेटपटूंना झटका! दाखवला बाहेरचा रस्ता

अश्लील व्हिडीओ व्हायरल

कार्यक्रमामध्ये अश्लील नृत्य करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, गावामध्ये मंडई मेळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये नागपूरमधील नृत्य करणाऱ्या एका ग्रुपमधील महिला नृत्य करत होती. त्यावेळी तिने कपडे काढत डान्स केला होता. त्यावेळी तिच्यासोबत काही जणांनी डान्स करत तिला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला होता. नृत्य करणाऱ्या महिलेवर यावेळी पैसेही फेकण्यात आल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलीस प्रशासनाची ठोस कारवाई

अश्लील नृत्य करतानाचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या हेड कॉन्स्टेबलने त्या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर गोबरवाही पोलीस ठाण्यात ज्या लोकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेतल पोलीस अधीक्षकांनी बुधवारी हेड कॉन्स्टेबल राकेश सिंग सोलंकी आणि कॉन्स्टेबल राहुल परतेकी यांना निलंबित केले आहे. ज्यांच्या कारवाई करण्यात आली आहे, ते कार्यक्रमादरम्यान त्या ठिकाणी गैरहजर असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> एक दोन नव्हे तर तब्बल 57 वेळा भोसकलं, जीव जाईपर्यंत थांबला नाही

    follow whatsapp

    ADVERTISEMENT