वर्धा: पाणी पिण्यास गेलेल्या बहिणींचा घसरला पाय, विहिरीत पडून दोघींची मृत्यू

मुंबई तक

Wardha Crime News : वर्ध्यात मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे. सेलूमध्ये दोन चिमुकल्या बहि‍णींचा शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. या भीषण दुर्घटनेनं सेलूतील साटोने कुटुंबावर मोठा दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

ADVERTISEMENT

Wardha Crime News
Wardha Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पाणी पिण्यास गेल्या आणि पाय घसरून विहिरीत पडल्या बहिणी

point

वडिलांनीही विहिरीत उडी मारली मात्र, चिमुकलींना वाचवण्यात अपयश

Wardha Crime News : सुरेंद्र रामटेके - वर्ध्यात मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे. सेलूमध्ये दोन चिमुकल्या बहि‍णींचा शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. या भीषण दुर्घटनेनं सेलूतील साटोने कुटुंबावर मोठा दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलींची उन्नती (वय 10) आणि दिव्या (वय 8) अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : हात पकडून घरात ओढलं, 24 वर्षीय दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार

पाणी पिण्यास गेल्या आणि पाय घसरून विहिरीत पडल्या बहिणी

घडलेल्या घटनेनुसार, सेलूतील धान्य मार्केट परिसरात राहणारे सचिन साटोने यांनी गुड शेफर्ड आणि स्कूल ऑफ ब्रिलियंटमध्ये शिक्षण घेणाऱ्या आपल्या दोन मुलाींना बाहेरगावी जाण्याचे कारण सांगून घेऊन गेले होते. दरम्यान, उन्नती आणि दिव्या या दोघीही शेतात पाणी पिण्यासाठी गेल्या होत्या. इतक्यातच त्यांचा विहिरीजवळ पाय घसरला आणि दोघीही विहिरीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. 

वडिलांनीही विहिरीत उडी मारली मात्र, चिमुकलींना वाचवण्यात अपयश

मुलींना वाचवण्यासाठी वडिलांनीही विहिरीत उडी मारली होती. मात्र, दुर्दैवाने चिमुकलींना वाचवण्यात अपयश आले आणि दोघींचा मृत्यू झाला. अशातच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, ही घटना वाऱ्यासारखी पसरली. अशातच ठाणेदार पंकज वाघोडे आणि पोलीस पथकाने नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेत विहिरीतून बाहेर काढले होते. नंतर त्यांना सेलू ग्रामीण रुग्णालयात पाठवले. 

हे ही वाचा : आई नातेवाईकांकडून घरी परतली, 18 वर्षीय लेकीचा बाथरूममध्ये मृतदेह

दरम्यान, ही घटना अपघाती आहे की यमागे काही वेगळं कारण आहे, याचा पोलीस पुढील तपास करत आहेत. या दुर्घटनेनं सेलू गावात शोककळा पसरली आहे.