Santosh Deshmukh Murder: कोण वाचणार, कोणाला होणार शिक्षा? 'यामुळे' सगळं होणार क्लिअर

मुंबई तक

Santosh Deshmukh Murder Case Chargesheet: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने तब्बल 1500 पानी दोषारोप पत्र दाखल केलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Santosh Deshmukh हत्या प्रकरणात 1500 पानी चार्जशीट दाखल

point

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्र दाखल

point

दोषारोप पत्रातून सत्य बाहेर येणार? काय दडलं 1500 पानात?

योगेश काशिद, बीड: बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात सीआयडीने तब्बल 1500 पानी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. या आरोप पत्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सत्य समोर येणार आहे.

नेमकं काय आहे चार्जशीट?

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. राज्यभर आंदोलने झाली, संतोष देशमुख कुटुंबाने आक्रमक भूमिका घेतली. आता मात्र, या हत्येचा संपूर्ण तपशील या दोषारोप पत्रातून उलगडणार आहे. सीआयडीच्या तपासानुसार, खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा>> Supriya Sule : "संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुप्रिया सुळे लढणार, माझा शब्द"

या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा सहभाग आहे का? हे तपासातून स्पष्ट होईल. "या प्रकरणात सात आरोपींनी कशा प्रकारे कट रचला, हत्या केली आणि त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आहे, यासंबंधी पुरावे चौकशीतून समोर  येणार आहे..

आरोपींनी हत्येसाठी वापरलेली शस्त्रे कोणती? हल्ला कसा झाला? हत्येची वेळ आणि ठिकाण कोणते? हे ही दोषारोप पत्रातून उघड होईल. तसेच, आरोपी फरार होण्यात कोणाच्या मदतीने यशस्वी झाले आणि त्यानंतर ते कुठे लपले होते? याचाही तपास करण्यात आला आहे. याशिवाय, कुठल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला? याचाही तपास सीआयडीने केला आहे.

हे ही वाचा>> Manoj Jarange : उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फक्त कागद दाखवून...

याच प्रकरणाशी संबंधित खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांमध्ये काही संबंध आहे का? याचाही तपास करण्यात आला आहे.

'डिजिटल पुराव्यांमधून (CDR डेटा) कोणाशी संपर्क झाला? वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या संघटित गुन्हेगारीतील आणखी काही बाबी समोर येणार का? आरोपींनी खंडणीमधून मिळवलेल्या संपत्तीचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे? आम्हाला न्याय हवा! हा गुन्हा फक्त एका व्यक्तीने नाही, तर एका मोठ्या टोळीने केला आहे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.' अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp