M. Tech ची डिग्री, IT कंपन्यांमध्ये जॉब अन् जुगाराचा नाद... पोलिसांनी चोर पकडला, कहाणी ऐकून सगळे हादरले

योगेश पांडे

नागपूरच्या छत्रपती नगर परिसरात नोकरीसाठी तो राहिलेला होता. त्यामुळे त्याला तिथल्या घरांची माहिती होती. त्यानं सुनसान बंगल्यांची पाहणी करून आतापर्यंत पाच घरांमध्ये चोरी केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर पोलिसांनी चोर पकडला, सगळं उगडकीस आलं

point

जुगाराच्या नादामुळे IT च्या विद्यार्थ्याचे चक्र कसे फिरले?

point

पोलीस तपासात समोर आल्या खळबळजनक गोष्टी

नागपूर : महाराष्ट्रातील नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका आरोपीला अटक केली. हा आरोपी साधासुधा चोर नसून, त्याची कहाणी भुवया उंचवायला लावणारी आहे. आशिष रेडीमल्ला (M.Tech धारक) याने पुणे आणि नागपूरमधील IT कंपन्यांमध्ये चांगल्या नोकऱ्या केल्या. पण जुगाराचं व्यसन लागल्यामुळे गुन्हेगारीच्या जगात आला. यानंतर आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या तरूणानं अनेक गुन्हे केल्याचं उघडकीस आलंय.

हे ही वाचा >> पुण्यातील महिलेने लिपस्टिकने लिहिली चिठ्ठी अन्... पुणेकरांना हादरवून टाकणारी घटना!

जुगारात 23 लाख हारला...

धंतोली परिसरातील शीतल चिंतलवार यांच्या घरात झालेल्या चोरीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर जिल्ह्यातील आशिषला अटक करण्यात आली. पोलीस तपासात समोर आले की, आशिषने जुगारात तब्बल 23 लाख रुपये गमावले होते. कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणि पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला. 

नोकरीसाठी जिथं राहिला, त्याच परिसरात चोरी

नागपूरच्या छत्रपती नगर परिसरात नोकरीसाठी तो राहिलेला होता. त्यामुळे त्याला तिथल्या घरांची माहिती होती. त्यानं सुनसान बंगल्यांची पाहणी करून आतापर्यंत पाच घरांमध्ये चोरी केली आहे. चोरीसाठी तो चंद्रपूरहून बसने नागपूरला यायचा.  आधी रिकाम्या घरांचा शोध घ्यायचा आणि नंतर चोरी करायचा. 

नागपूरच्या अनेक भागात टचोरी केल्याची माहिती 

आरोपीने धंतोलीसह नागपूरच्या इतर भागातही चोरी केल्याची कबुली दिली आहे. धंतोली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर मोठा दिलासा मिळाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिक मिर्झापुरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितलं की, आशिषने पैसे मिळवण्यासाठी चोरी केल्याचं कबूल केलं असून, नागपूरच्या अनेक भागांत त्याने चोऱ्या केल्या आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp