घोर कलियुग! लग्नानंतर बायकोने बॉयफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो नवऱ्याला पाठवले अन्...
Extra marrital affair : पश्चिम बंगालमधील हावडा येथे शुभेंदू साह नावाच्या एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली आहे. तरुणाच्या पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडचे आणि तिचे अश्लील फोटो शुभेंदू साहला पाठवले. यानंतर शुभेंदूचं मानसिक स्वास्थ बिघडलं आणि त्याने आत्महत्या केली.

बातम्या हायलाइट

सिक्कीममध्ये हनिमून हत्याकांडाची पुनरावृत्ती

शुभेंदू साहा या तरुणाच्या मृत्यूचे गूढ कारण आलं समोर
Extra marrital affair : मेघालयातील सिक्कीममधील हनिमून हत्याकांडाची घटना ताजी असताना याच घटनेची पुनरावृत्ती पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात दिसून आली. पश्चिम बंगालच्या हावडा येथील शुभेंदू साहा या तरुणाचा खून करण्यात आला. या खूनामुळे झालेल्या मृत्यूचे गूढ समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी नादिया जिल्ह्यातील हरणघाटा पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या कुटुंबावर हत्येच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याचपार्श्वभूमीवर तरुणाच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
हेही वाचा : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...
नेमकं प्रकरण काय?
हावडा येथील शियालडांगा येथील रहिवासी शुभेंदू साहाचे लग्न हे नादिया येथील उमा देवी नावाच्या तरुणीशी झालं होतं. लग्नानंतर उमा देवी यांचे तिच्या जुन्या प्रियकरासोबत संबंध होते, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. उमा देवी आणि तिच्या बॉयफ्रेंडचे अनेक अश्लील फोटो शुभेंदूच्या मोबाईलवर पाठवण्यात आले होते, यामुळे शुभेंदू आता मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे.
दोन महिन्यांपूर्वी कौटुंबिक वादानंतर उमा देवी ही तिच्या माहेरी परतली. शुभेंदू दर रविवारी आपल्या पत्नी आणि मुलांना भेटायला जात होता. तो गेल्या रविवारी त्यांना भेटण्यासाठी गेला होता, पण शुभेंदूच्या सासरच्यांनी फोन करुन मृत्यूबाबतची माहिती कुटुंबाला दिली होती.
या प्रकरणात आता शुभेंदूच्या कुटुंबियांनी धक्कादायक आरोप केले आहेत. शुभेंदूला मारहाण करत ठार मारण्यात आलं. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आहेत. त्याच वेळी, त्याची पत्नी उमा देवी यांनी दावा केला की, शुभेंदूनं तिला अनेकदा मारहाण केली होती. त्यानंतर शुभेंदू घराच्या छतावर गेला आणि त्याने आत्महत्या केली.
हेही वाचा : जावई सासूसोबत नाही तर तिच्या 'सुनेसोबत' गेला पळून, बायकोला म्हणाला, तुझी वहिनी जरा जास्तच...
शुभेंदूच्या कुटुंबाने उमा देवी आणि तिच्या कुटुंबातील अनेक सदस्यांविरुद्ध हरणघाटा पोलीस ठाण्यात खून केल्याच्या कलमांन्वये एफआरआय दाखल करण्यात आला होता. कुटुंबाचे म्हणणं आहे की, उमा देवी यांचा प्रियकर त्यांना सतत फोनवरून धमकावत आहे आणि जर त्यांनी केस मागे न घेतल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच दिली. संबंधित प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरु करण्यात आला आहे.