अश्लील व्हिडीओ पाहताय? होईल मोठा कांड..सायबर सेलने लोकांना केलं मोठं आवाहन! 'त्या' प्रकरणामुळं...

मुंबई तक

Cyber Crime Latest News : डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून आता सायबर सेलने याविरोधात कठोर पावलं उचलली आहेत.

ADVERTISEMENT

Cyber Cell Latest News Update
Cyber Cell Latest News Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नावाने एक फेक मेसेज आला आणि..

point

तो ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये सामील?

point

सायबर सेलने लोकांना केलं मोठं आवाहन

Cyber Crime Latest News : डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून आता सायबर सेलने याविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. अश्लील व्हिडीओ आणि फोटो, विशेषत: चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे खोटे आरोप लावून लोकांचं मानसिक त्रास दिला जातो. हैदराबादमध्ये अशाच प्रकारचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या माध्यमातून लोकांना खोटा व्हाट्सअॅप मेसेज आणि कॉलच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवण्याची धमकीही देतात. 

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नावाने एक फेक मेसेज आला आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, एलबी नगरच्या एका तरुणाला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नावाने एक फेक मेसेज आला होता. ज्यामध्ये लिहिलं होतं की, त्याचा आयपी अॅड्रेस चाईल्ड पोर्नोग्राफीशी जोडलेला आहे. जर 24 तासात उत्तर मिळालं नाही, तर दिल्ली पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. त्यानंतर तरुण भयभीत झाला होता. पण नंतर त्याला समजलं की, एका सायबर भामट्याने त्याला धमकी दिली आहे. लोकांकडून पैसे वसूल करणं हा त्याचा हेतू आहे, हे त्या तरुणाला समजलं.

हे ही वाचा >> M. Tech ची डिग्री, IT कंपन्यांमध्ये जॉब अन् जुगाराचा नाद... पोलिसांनी चोर पकडला, कहाणी ऐकून सगळे हादरले

अशाप्रकारे एका सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला कॉल आला. ज्यामध्ये म्हटलं की, तो ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये सामील आहे. त्यांचा आधार नंबर मागण्यात आलं. भीतीपोटी त्याने नंबर दिला आणि नंतर 1.5 लाख रुपयांचा गंडा घातला.हे सायबर भामटे CBI, NCB सायबर सेल किंवा गृह मंत्रालयाचे अधिकारी सांगून लोकांना धमकी देतात. तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, असं ते सांगतात.

यामुळे लोक घाबरतात आणि वैयक्तीक माहिती शेअर करतात. असे गुन्हेगार पीडित व्यक्तीची मानसिकता पाहून त्यांच्या मजबुरीचा फायदा उचलतात. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, कोणतीही सरकारी यंत्रणा व्हाट्सअॅप किंवा सामान्य कॉलवर संपर्क करत नाही. अशा प्रकरणात gov.in किंवा nic.in या वेबसाईट्सवरच कारवाईचा मेसेज केला जातो.

हे ही वाचा >> मेट्रोमोनी साईटवर सेटिंग झाली..तरुणाने लग्नाआधीच तरुणीला गोव्याला नेलं..संबंध केल्यानंतर घडलं भयंकर!

सायबर सेलने लोकांना आवाहन केलं आहे की, कोणतंही फेक कॉल किंवा मेसेजला घाबरून वैयक्तीक माहिती शेअर करू नका. लगेच 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा. त्याचसोबत कोणत्याही व्यक्तीला आधारनंबर, OTP किंवा पासवर्ड शेअर करू नका. 

हे वाचलं का?

    follow whatsapp