Sonam Raghuwanshi News: हनिमूनला राजासोबत; राज कुशवाहसोबत खुनाचा कट.. पण सोनम होती तिसऱ्याच व्यक्तीच्या टचमध्ये!
Sonam-Raja Raghuwanshi Murder Case : सोनम-राजा रघुवंशी हनिमून प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सोनम राजासोबत हनिमूनला गेली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोनम आणि विशालने राजाचा मोबाईल फोडला आणि नंतर..

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर

तो तिसरा व्यक्ती कोण? जो सोनमच्या संपर्कात होता
Sonam-Raja Raghuwanshi Murder Case : सोनम-राजा रघुवंशी हनिमून प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सोनम राजासोबत हनिमूनला गेली होती. त्यानंतर तिने प्रियकर राज कुशवाहसोबत हत्येचं प्लॅनिंग केलं होतं. परंतु, या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोनम राज कुशवाहलाही धोका देत असल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणाचा तपास सुरु असताना संजय वर्मा या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. तो कुठे राहतो आणि सोनम त्याला कशी ओळखते, याचा तपास सुरु आहे.
सोनम आणि विशालने राजाचा मोबाईल फोडला आणि नंतर..
मिळालेल्या माहितीनुसार, मेघालयचा प्रसिद्ध सोहरा चेरापूंजी परिसरात राजा रघुवंशी आणि सोनम 23 मे रोजी हनिमूनला गेले होते. पण तो प्रवास प्रेमाचा नव्हता, प्लॅन मर्डरचा होता. 2 जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह एका खोल दरीत सापडला. त्यानंतरच्या तपासात समोर आलं की, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहसोबत हत्येचा कट रचला होता आणि 3 सुपारी किलर्सलाही यात सामील केलं होतं.
हे ही वाचा >> जावई सासूसोबत नाही तर तिच्या 'सुनेसोबत' गेला पळून, बायकोला म्हणाला, तुझी वहिनी जरा जास्तच...
पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण फक्त प्रेमसंबंधांपूरतं मर्यादित नाही. तर या प्रकरणात आर्थिक किंवा डिजिटल ब्लॅकमेलिंग झाल्याचा तपासही केला जात आहे. आता संजय वर्मा आणि अन्य दोन संशयितांचा शोध घेतला जात आहे, जे सोनमच्या सतत संपर्कात होते.राजावर तीनवेळा वार करण्यात आले. सर्वात आधी आरोपी विशाल चौहानने राजावर हल्ला केला. नंतर आनंद कुर्मी आणि आकाश ठाकूरने हल्ला केला. हत्येनंतर राजाचा मृतदेह दरीत फेकला गेला. त्यानंतर त्याचा मोबाईल सोनम आणि विशालने तोडला.
हे ही वाचा >> पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...
मेघालय पोलिसांनी मंगळवारी सोनम आणि तीन आरोपींसोबत क्राईम सीनचं रीक्रिएशन केलं. ही प्रक्रिया व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्वतंत्र साक्षीदारांच्या समोर केली हेली. एसपी विवेक सायमने म्हटलं की, आता आमच्याकडे संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट आहे. सोनम कशाप्रकारे समोर उभी होती आणि हल्लेखोर पाठीमागून वार करत होते, सर्वकाही समोर आलं आहे.