मेट्रोमोनी साईटवर सेटिंग झाली..तरुणाने लग्नाआधीच तरुणीला गोव्याला नेलं..संबंधानंतर काय घडलं?
Shocking Viral News : भोपाळची एक तरुणी नोएडात सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करत होती. ती एक मोठ्या कंपनीत नोकरी करत होती. या तरुणीला दरमहा दीड लाख रुपये पगार होता. पण नंतर घडलं..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तरुणाने पीडितेला गोव्याला फिरायला नेल्यावर काय घडलं?

तरुणीचा विश्वास जिंकला अन् मोबाईलचा पासवर्ड..

आरोपी जयपूरला गेला अन् नंतर घडलं..
Shocking Viral News : भोपाळची एक तरुणी नोएडात सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करत होती. ती एक मोठ्या कंपनीत नोकरी करत होती. या तरुणीला दरमहा दीड लाख रुपये पगार होता. लग्न करण्यासाठी या तरुणीने एका मॅट्रोमोनिअल साईटवर नोंदणी केली. या साईटच्या माध्यमातून ही तरुणी लग्नासाठी मुलाच्या शोधात होती. एका मुलाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर दोघांमध्येही बोलणं झालं. पण त्यानंतर धक्कादायक प्रकार घडेल, याची जराही कल्पना त्या मुलीला नव्हती. ज्या मुलासोबत तिने लग्नासाठी बोलणं केलं, त्याने तिचा विश्वास जिंकला. त्याच्यासोबत मैत्री केली आणि लग्नाचं वचन दिलं. पण नंतर असं काही घडलं ज्यामुळे त्या पीडित मुलीला पोलिसांमध्ये तक्रार दाखल करावी लागली.
तरुणाने पीडितेला गोव्याला फिरायला नेल्यावर काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, त्या तरुणाने मुलीला लग्नाचा शब्द दिला होता. पण लग्नाआधीच त्याने तरुणीसोबत संबंध ठेवले. तरुणाने तिला गोवा, कर्नाटक आणि शिमलामध्ये फिरायला नेलं. धक्कादायक बाब म्हणजे त्या तरुणाने तिच्याकडे तब्बल 65 लाखांची मागणी केली. पण तरुणीला माहित झालं की, ज्या मुलासोबत ती लग्न करणार आहे, तो विवाहित आहे.
हे ही वाचा >> M. Tech ची डिग्री, IT कंपन्यांमध्ये जॉब अन् जुगाराचा नाद... पोलिसांनी चोर पकडला, कहाणी ऐकून सगळे हादरले
तरुणीला हे समजताच तिने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ही खळबळजनक घटना नोएडा येथील सेक्टर 58 मध्ये घडल्याचं समजते. पीडित तरुणी भोपाळची रहिवासी आहे. ती नोएडाच्या एका मोठ्या आयटी कंपनीत काम करते. कुटुंबियांना मुलीच्या लग्नाची काळजी वाटत होती. त्यामुळे तरुणीने मॅट्रोमोनियल साईटवर तिचं प्रोफाईल बनवलं आणि लाईफ पार्टनरचा शोध घेतला.
तरुणीचा विश्वास जिंकला अन् मोबाईलचा पासवर्ड..
आरोपी तरुणाने तरुणीचा मोबाईल त्याच्याजवळ ठेवला. त्याने तरुणीच्या खात्यात असलेले 25 लाख रुपयेही त्याच्या खात्यात वळवले. त्यानंतर मुलीच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन अॅपद्वारे 25 लाखांपर्यंतचा पर्सनल लोनही घेतला. आरोपीने तरुणीला फसवल्याचं तिला सुरुवातीला समजलच नाही. तसंच आरोपीने पीडितेला सांगितलं होतं की, तो एका कंपनीचा मालक आहे आणि त्याचा मोठा उद्योग आहे.
हे ही वाचा >> पुण्यातील महिलेने लिपस्टिकने लिहिली चिठ्ठी अन्... पुणेकरांना हादरवून टाकणारी घटना!
त्याने तरुणीला नोकरी सोडण्यासाठीही सांगितलं. 16 मार्च 2025 रोजी आरोपी जयपूरला गेला. त्यानंतर तो तरुणीला भेटला नाही, असं पीडितेचं म्हणणं आहे. दरम्यान, पीडित तरुणीने आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.