पैसे थकले, दिली धमकी; महिलेची Ind-Pak सामन्याच्या तिकीटांच्या नावाने लाखोंची फसवणूक!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

With A Businessman woman had A fraud for Ind-Pak World Cup match tickets one Accused arrested
With A Businessman woman had A fraud for Ind-Pak World Cup match tickets one Accused arrested
social share
google news

Cricket Ticket Fraud : मुंबईत एका महिला व्यावसायिकासोबत 15 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात या महिला व्यावसायिकाला भारत-पाकिस्तान (Ind-Pak World Cup Match) विश्वचषक सामन्याची तिकीट देण्याच्या नावाखाली दोन नराधमांनी फसवले. 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 37 वर्षीय एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, मात्र त्याचा साथीदार फरार आहे. (With A Businessman woman had A fraud for Ind-Pak World Cup match tickets one Accused arrested)

तक्रारदार महिलेला धमकावत उरलेले पैसे देण्यास नकार!

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते. तिने अहमदाबादमधील क्रिकेट स्टेडियमच्या अध्यक्षपदाच्या कॅटेगरीसाठी 18 तिकिटांची व्यवस्था करण्यासाठी दोन आरोपींपैकी एक असलेल्या सौरभ निकमला 34 लाख रुपये दिले होते. पण सौरभ निकम आणि दुसरा आरोपी व्यंकट मंडला यांनी तक्रारदाराला फक्त 9 तिकिटंच दिली.

वाचा: Hardik Pandya IPL 2024 : हार्दिकसाठी मुंबई इंडियन्सने सोडला 17.50 कोटींचा खेळाडू, कारण…

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा व्यावसायिक महिलेने उर्वरित तिकिटांची मागणी केली तेव्हा त्याने तिला धमकावले आणि पैसे परत करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, व्यंकट मंडलाचे क्रिकेट बुकी आणि मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांशी जवळचे संबंध आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा: Nashik Accident : नाशिकच्या 5 भाविकांवर काळाचा घाला, कार-कटेंनरच्या भीषण अपघताात मृत्यू

अधिकाऱ्याने सांगितले की, जुहू येथील एका बंगल्यावर तिकिटांचा सौदा निश्चित झाला होता. ते म्हणाले की भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेच्या वितरणास प्रवृत्त करणे) यासह संबंधित कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, पुढील तपास सुरू आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT