नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
योगेश पांडे, नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एका 28 वर्षीय तरुण कैद्याचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी नातेवाइकांनी केला आहे. नागपुरातील नंदनवन परिसरातील श्रीनगर येथे राहणारा आकाश ताराचंद घोड हा 28 वर्षीय युवक हत्येच्या आरोपाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कोठडीमध्ये कैद होता. कैदेत असतानाच त्याचा […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एका 28 वर्षीय तरुण कैद्याचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी नातेवाइकांनी केला आहे. नागपुरातील नंदनवन परिसरातील श्रीनगर येथे राहणारा आकाश ताराचंद घोड हा 28 वर्षीय युवक हत्येच्या आरोपाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कोठडीमध्ये कैद होता. कैदेत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने आता या प्रकरणी अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे पोलिसांच्या मारहाणीत आकाशचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
नेमकं घडलं तरी काय?
शनिवारी संध्याकाळच्या सुमारास आकाशची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु काही वेळाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यानंतर पोलिसांनी आकाशच्या मृत्यूची संपूर्ण माहिती त्याच्या कुटुंबीयांना तात्काळ दिली. त्यानंतर नातेवाईकांनी नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये एकच गर्दी केली.