Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / Buldhana: शिक्षक की राक्षस?; नापास करण्याची धमकी देऊन करायचा अश्लील चाळे
गुन्ह्यांची दुनिया

Buldhana: शिक्षक की राक्षस?; नापास करण्याची धमकी देऊन करायचा अश्लील चाळे

जका खान, बुलढाणा

Crime news : बुलढाणा : मिलिटरी स्कूलच्या (Military School) शिक्षकाने इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन (Misbehaving) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) येथील आहे. जिथे परीक्षेत नापास करण्याची भीती दाखवून शिक्षकाने आपल्यासोबत अन्याय केल्याचे संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तर आरोपी शिक्षक फरार आहे. (A complaint was lodged in the police station in this regard)

हे धक्कादायक प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड गावातील सैनिकी शाळेशी संबंधित आहे. शाळेत दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींशी त्यांच्या शिक्षकाने गैरवर्तन केल्याची माहिती मिळत आहे. पीडित विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या चुकीच्या गोष्टीची माहिती कुटुंबीयांना दिली होती.

मुंबईतली डेंजरस क्राईम स्टोरी! पतीला रोज थोडं थोडं मारणाऱ्या पत्नीबद्दल समोर आल्या हादरवणाऱ्या गोष्टी

नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

मुलांसोबत घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला. यानंतर नातेवाइकांनी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधून पोलिस ठाण्यात जाऊन शाळेतील शिक्षकाने लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता. मात्र, पोलिस आरोपी शिक्षकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तो पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

परीक्षेत नापास करण्याची धमकी द्यायचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक विद्यार्थ्यांना परीक्षा आणि प्रॅक्टिकलमध्ये नापास करण्याची धमकी देऊन त्यांच्याशी गैरवर्तन करायचा. हे त्याने अनेकदा केले. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना शिक्षकाबाबत सांगितले.

Crime: Instagram वरील मित्राने महिलेला विकलं; जबरदस्तीने लग्न, लैंगिक अत्याचार

पोलिसांची दोन पथके आरोपीच्या शोधात आहेत

पोलिस अधिकारी सचिन कदम सांगतात की, मिलिटरी स्कूलच्या शिक्षकाने दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार रविवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी शिक्षकाला अटक करण्यात येईल.

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?