2000 मुली, 6 मसाज पार्लर, अय्याशीत जगलेला सेक्स किंग, आता भोगतोय…

मुंबई तक

चुविट कामोलविजिट कधी काळी हे नाव थायलंडमध्ये गाजत होते. कधी सेक्स किंग कधी अय्याशीत जगणारा, पोलिसांना पिशव्या भरुन देणारा आणि आरोपी असला तरी सतत चर्चेत राहणारा चुविट आता मात्र पश्चात्तापाचं आयुष्य जगत आहे. आता 62 वर्षाच्या असलेला चुविट आपल्याच आयुष्याकडे पाहताना म्हणतो आता हे सगळं नकोसं झालं आहे.

ADVERTISEMENT

Thailand sex king owns 6 massage parlors 2 thousand girls lives luxurious life Chuvit Kamolvisit last element
Thailand sex king owns 6 massage parlors 2 thousand girls lives luxurious life Chuvit Kamolvisit last element
social share
google news

Sex King: जगात काही लोकांविषयी अनेक किस्से सांगितले जातात. कारण काही माणसं ही त्यांच्या आयुष्यात जे करायचे आहे तेच करत असतात. मात्र शेवटी त्यांच्या हाती येतं काय तर फक्त पश्चात्ताप. सेक्स किंग (Sex King) म्हणून ज्यांची जगात ओळख आहे, ते चुविट कामोलविजिट (chuvit kamolvisit) आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. सगळं आयुष्य ऐशोआरामात घालवणाऱ्या चुविट कामोलविजिटला आता पश्चात्ताप होत आहे. त्याला पश्चात्ताप होत आहे की तो आपलं जीवन कसा जगला, त्या गोष्टींचा होतो आहे पश्चात्ताप. वर्षानुवर्षे केलेल अवैध धंदे (Illegal businesses), मुली (girls), सेक्स (Sex), भ्रष्टाचार (corruption) आणि अनेक गोष्टींचा आता त्याला पश्चात्ताप होतो आहे.

आयुष्य दोन नंबरच्या धंद्यात

जगात चुविट हा सेक्स किंग म्हणून प्रसिद्ध असला तरी थायलंडमधील लोकं आजही त्याला भ्रष्टाचार संपवणारा खरा हिरो असच समजतात. चुविटला खरी ओळख मिळाली ती 2003 नंतरच. चुविट अनेक वर्षापासून अवैध धंद्यातच गुंतला होता. थायलंडमध्ये वेश्याव्यवसाय हा बेकायदेशीर मानला जातो मात्र चुविटने त्या धंद्याचाही आपल्यासाठी फायदा करुन घेतला. कारण बँकॉकमध्ये त्याचे 6 मसाज पार्लर होते, ज्यामध्ये 2 हजार पेक्षा जास्त मुली काम करत होत्या. तो दोन नंबरच्या धंद्यात असल्यामुळेच थायलंडमधील पोलीसही त्याच्या हातातील बाहुले झाले होते.

हे ही वाचा >> Viral Video: हेलिकॉप्टरने उतरले अन् जहाज केलं हायजॅक, Israel ला थेट आव्हान?

सेक्स किंग चुविट

चुविट कामोलविजिट हा भ्रष्टाचारासाठी इतका प्रसिद्ध होता की, आपले गुन्हे लपवण्यासाठी पोलिसांना तो पिशव्या भरुन पैसे पाठवत होता. आपले काळे धंदे लपवण्यासाठी पोलिसांना तो रोलेक्स घड्याळे काय किंवा मसाज पार्लरमधील मुली असो या सेक्स किंगने पोलिसांसाठी पाहिजे त्या गोष्टी केल्या आहेत. चुविट सांगतो की, त्याने 1 हजार पेक्षा अधिक पोलिसांना लाच दिली होती, आणि हे कित्येक वर्षे चालूच होते असंही तो सांगतो. मात्र 2003 मध्ये सेक्स किंग चुविटला पोलिसांना अटक केली आणि त्याचे अनेक गुन्हे उघड झाले. त्यानंतर मात्र महागड्या कारमधून फिरणारा आणि अलिशान बंगल्यात राहणारा हा सेक्स किंग नंतर थेट तुरुंगात पोहचला होता.

हजारो पोलिसांना दिली लाच

ज्या सेक्स किंगने हजारो पोलिसांना लाच दिली होती, त्यातील एकही पोलीस नंतर त्याच्या मदतीला आला नव्हता. त्यामुळे तो तुरुंगात गेल्यानंतर मात्र त्याचं आयुष्य सगळच बदलून गेले होते. मात्र जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला त्यावेळी मात्र त्याने टीव्ही शोच्या माध्यमातून चुविटने आपल्या आयुष्यातील वास्तव सांगण्यास सुरुवात केली, मात्र तोपर्यंत त्याच्या आयुष्याची कोणालाच काही कल्पना नव्हती.

हे वाचलं का?

    follow whatsapp